शिवसेनेचे 'ठाणे' जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'गणेशा'चा धावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 10:50 AM2019-02-13T10:50:14+5:302019-02-13T10:52:24+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ठाणे काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Ganesh Naik will NCP's candidate from Thane? | शिवसेनेचे 'ठाणे' जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'गणेशा'चा धावा?

शिवसेनेचे 'ठाणे' जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'गणेशा'चा धावा?

Next
ठळक मुद्देआगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ठाणे काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहेठाणे लोकसभा मतदारसंघातून नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरूआगामी लोकसभा निवडणुकीनंतर आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी अधिकाधिक खासदार निवडून आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न

ठाणे - मुंबई महानगराच्या अगदी शेजारी वसलेले ठाणे शहर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. अपवाद वगळता येथे सर्वच राजकीय संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. दरम्यान, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हे ठाणे काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, या मतदारसंघातून नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. 

लोकसभेच्या ठाणे मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू आहे.  या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच गणेश नाईक उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीत ठाण्यातील राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी अधिकाधिक खासदार निवडून आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून दिग्गज उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. 
 

Web Title: Ganesh Naik will NCP's candidate from Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.