गणेशपुरी पोलीस ठाण्याला हक्काचा ठाणेदार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:34 AM2019-06-13T00:34:48+5:302019-06-13T00:35:10+5:30
वज्रेश्वरी दरोडा प्रकरण : मंदिरात खाजगी सुरक्षारक्षक नेमले नाही
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी मंदिरातील दरोड्यानंतर ते मंदीर ज्या गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्या पोलीस ठाण्याला गेल्या काही दिवसांपासून हक्काचा ठाणेदार मिळालेला नाही. यामुळे त्या पोलीस ठाण्याच्या कारभार सद्यस्थितीत दुसऱ्या पोलीस ठाण्यातील एका अधिकाºयाच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यातच वज्रेश्वरी मंदीर प्रशासनाने पोलिसांनी सुचवल्याप्रमाणे अद्यापही खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली नसल्याने ग्रामीण पोलीसच मंदीर परिसरात पहारा देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१० मे रोजी वज्रेश्वरी मंदीरातील सुरक्षारक्षकाला बांधून दरोडा टाकण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून दरोड्यातील बºयापैकी मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यातच कारवाईनंतर पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मंदिरात पुन्हा दरोडा किंवा चोरीच्या घटना घडणार नाहीत, यासाठी मंदीर प्रशासनाला खाजगी सुरक्षारक्षक नेमण्यास सांगून पोलिसांद्वारे पहारा ठेवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पोलीस यंत्रणेमार्फत मंदीर परिसरात ग्रस्त वाढवला आहे. मात्र, मंदीर प्रशासनाने अद्यापही सुरक्षारक्षक नेमले नाहीत. याचदरम्यान, गणेशपुरी पोलीस ठाण्याचा कारभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे यांच्यावर एका जुन्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ते वैद्यकीय सुटीवर गेले आहेत. त्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्याचा कारभार भिंवडी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवला आहे.लोंढे यांच्यावरील कारवाई प्रकरणी चौकशी होणे बाकी आहे. अधिकाऱ्यांच्याही बदल्या अपेक्षित असल्याने त्या पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कारभार एका अधिकाºयाकडे सोपवला आहे.
मंदीर प्रशासनाने अद्यापही खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली नाही. त्याबाबत त्यांना लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच पोलीस मुख्यालय आणि स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत चोवीस तासांसाठी दोन पोलिसांद्वारे पहारा दिला जात आहे. तर गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लोंढे हे वैद्यकीय सुटीवर आहेत. त्यामुळे गणेशपुरी पोलीस ठाण्याचा कारभार सहायक पोलीस निरीक्षक घाटकर यांच्याकडे दिला आहे.
- डॉ. शिवाजी घाटकर , पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण