बनावट सीडीसी तयार करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 04:04 AM2017-08-04T04:04:16+5:302017-08-04T04:04:18+5:30
देशविदेशांत शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अनिवार्य असलेले सीडीसी (कन्टिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट) अर्थात निरंतर निर्वहन प्रमाणपत्र बनावट छापून त्याची विक्री
Next
ठाणे : देशविदेशांत शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अनिवार्य असलेले सीडीसी (कन्टिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट) अर्थात निरंतर निर्वहन प्रमाणपत्र बनावट छापून त्याची विक्री करणा-या टोळीला ठाणे पोलिसांनी गजाआड केले. चौघांना अटक केली असून पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठीचे साहित्यही जप्त केले.
बनावट सीडीसी विकण्यासाठी आरोपी नौपाडा भागात येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डोंबिवलीतील अब्दुल्ला मनत्तुमपाडत हकीम, ठाण्यातील विजयन गोपाल पिल्ले, मालाडमधील अलीम मोहद्दीन मुसा आणि पाली येथील प्रदीप उर्फ दिनेश शंकर रौधळ याला अटक केली.