मुंब्य्रातून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या चौघा जणांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:22 AM2020-07-01T01:22:41+5:302020-07-01T01:29:00+5:30

गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा दिवा परिसरात वाहने चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. मुंब्रा पोलिसांनी सापळा रचून यातील अरशद शेख याच्यासह चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नामांकित कंपन्याच्या तीन लाख ८० हजारांच्या १२ मोटारसायकली आणि दोन लाख ९०हजारांच्या तीन रिक्षा अशी सहा लाख ७० हजारांची वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

A gang of four persons was arrested for stealing motorcycles from Mumbra | मुंब्य्रातून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या चौघा जणांची टोळी जेरबंद

वाहन चोरीच्या १४ गुन्हयांची उकल

Next
ठळक मुद्देमुंब्रा पोलिसांची कारवाई१२ मोटारसायकली आणि तीन रिक्षा हस्तगतवाहन चोरीच्या १४ गुन्हयांची उकल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लॉकडाऊनचा गैरफायदा घेत मुंब्रा, डायघर आणि दिवा परिसरात दुचाकी तसेच रिक्षांची चोरी करणाºया अरशद शेख (१९, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे) याच्यासह चौघा वाहन चोरटयांना मुंब्रा पोलिसांनी अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली. त्यांच्याकडून १२ मोटारसायकली आणि तीन रिक्षा अशी सहा लाख ७० हजारांची वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरारत असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ठाणे शहरासह मुंब्रा, डायघर आणि दिवा परिसरात दुचाकी वाहने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. विशेष करून मुंब्रा परिसरातून मोटारसायकली चोरीचे प्रमाण अधिक वाढले होते. या घटना रोखण्यासाठी तसेच उघडकीस आणण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंब्रा पोलीसांना आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गळवे यांनी मुंब्रा आणि दिवा भागात पेट्रोलिंग वाढवून गुप्त खबऱ्यांच्या मदतीने वाहन चोरटयांचा शोध घेतला. मुंब्रा परिसरातील काही तरु ण मुले मोटरसायकलचे लॉक तोडून वाहने चोरी करीत असल्याची माहिती कड यांच्या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे उपनिरीक्षक संजय गळवे यांच्या पथकाने अशरद शेख, सुरेश सरोज (१९, साबेगाव, दिवा), अमान शेख (२०, कौसा, मुंब्रा) आणि सुफियान शमीम अन्सारी (१९, कौसा, मुंब्रा) या चौघांना २३ ते २९ जून या सापळा रचून दरम्यान ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीमध्ये त्यांनी वाहने चोरल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून विविध नामांकित कंपन्याच्या तीन लाख ८० हजारांच्या १२ मोटारसायकली आणि दोन लाख ९०हजारांच्या तीन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील १३ आणि डायघरमधील एक अशी १४ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.

Web Title: A gang of four persons was arrested for stealing motorcycles from Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.