ठाणे, भिवंडी परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Published: June 6, 2024 05:47 PM2024-06-06T17:47:32+5:302024-06-06T17:47:54+5:30

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने हस्तगत

Gang of thieves arrested in Thane, Bhiwandi area | ठाणे, भिवंडी परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

ठाणे, भिवंडी परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्याच्या डायघर आणि भिवंडी परिसरातील घरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा (२५, रा. रांजनोली, भिवंडी) याच्यासह पाच जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. या टोळीकडून ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने असा आठ लाख ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपासाची सूत्रे हलविण्यात आली होती. डायघर भागात चोरी करणारा राजदूत उर्फ इम्रान शेख उर्फ सागर (२६, रा. भिवंडी) याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ३ मे २०२४ रोजी ताब्यात घेतले होते. डायघर भागात नोव्हेंबर २०२३ मध्ये एका घरातून चोरलेल्या चार मोबाईलची त्याने कबूली दिली. हे ४० हजारांचे मोबाईलही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. याच गुन्हयाच्या समांतर तपासामध्ये आरोपी सागर याच्याकडील चौकशीमध्ये अन्य ठिकाणी चोरी करणारे अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ वारा , मोहमद शमशुद्दीन (१९) मोहमद अन्सारी (२६) आणि मोहमंद खान (२८) या चौघांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी आणि उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ यांच्या पथकाने २ जून २०२४ रोजी अटक केली.

त्यांच्याविरुद्ध डायघर पोलिस ठाण्यात चोरीसह हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी मोहमद खान याच्याकडून एक लाख पाच हजारांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सहा लाख ९४ हजारांचे ४३ मोबाईल आणि तीन हजार सहाशेची रोकड असा ऐवज हस्तगत केला. तपासात डायघरमधील तीन गुन्हे आणि मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्याचा एक असे चार गुन्हे उघडडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, ४३ मोबाईल, स्कूटर आणि ष्घरफोडीसाठी वापरलेली सामुग्री असा आठ लाख ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आराेपींपैकी अख्तर खान याच्याविरुद्ध डायघरमध्ये दाेन तर िभवंडीत सहा असे आठ चाेरीचे गुन्हे दाखल आहेत.
 

Web Title: Gang of thieves arrested in Thane, Bhiwandi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.