सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनावच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 11:35 PM2017-08-06T23:35:45+5:302017-08-06T23:35:52+5:30

पतीला बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात गोवणाºयांवर तसाच आरोप करून सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनाव केल्याची कबुलीच कळव्याच्या घोलाईनगर येथील महिलेने ठाणे न्यायालयात दिली आहे

The gang rape of 'So' made! | सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनावच!

सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनावच!

Next

जितेंद्र कालेकर
ठाणे : पतीला बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात गोवणाºयांवर तसाच आरोप करून सामूहिक बलात्काराचा ‘तो’ बनाव केल्याची कबुलीच कळव्याच्या घोलाईनगर येथील महिलेने ठाणे न्यायालयात दिली आहे. खोटी फिर्याद देऊन पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून न्यायालयाची दिशाभूल करणाºया या महिलेवरही आता कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आपल्यावर सहा जणांनी सामूहिक अत्याचार करून अ‍ॅसिडहल्ला केल्याचा बनाव या महिलेने २३ जुलै २०१७ रोजी केला होता. तशी तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. याप्रकरणी सहापैकी गोपाल कल्लीम, रंगाप्पा आणि शेखर शंके या तिघांना कळवा पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, कळवा विभागाचे सहायक आयुक्त रमेश धुमाळ, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान आदींच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिसांनी केलेल्या चौकशीत सहापैकी उर्वरित तिघे हे कर्नाटक आणि तेलंगणात असल्याचे उघड झाले. हा सर्वच प्रकार बनावट असल्याचे अनेक सबळ पुरावेच पोलिसांनी दिल्यानंतर तिच्या मुलीने आणि नंतर तिनेही ते मान्य केले. परंतु, न्यायालयातही तिने तोच जबाब देणे गरजेचे होते. ठाणे न्यायालयात याबाबत सुनावणी झाली, त्या वेळी तिने मुलीच्या सल्ल्यानुसार या बनावाची कबुली दिली.
आरोपींपैकी शिरसप्पाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकल्याचा तिचा पती व्यंकटेश यांच्यावर आरोप झाला होता. त्यामुळे विनयभंग आणि अ‍ॅसिडहल्ल्यात त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण प्रकरणात आपल्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पुन्हा ते त्याला ३ आॅगस्ट रोजी आणखी एखाद्या प्रकरणात गोवण्याच्या तयारीत होते. हे कळाल्यामुळेच त्याने आपल्या मुलीची काळजी घे, असा फोन पत्नीला केला. हे संभाषण मुलीनेही ऐकल्यामुळेच तिनेच वरील सहा जणांना या बलात्कार नाट्यात अडकवून अद्दल घडवण्याची शक्कल आईला सुचवली. त्यामुळेच त्यांच्यावर हा आरोप केल्याचे अखेर या महिलेने न्यायालयासमोर सांगितले. आरोपच खोटा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कलीमसह तिघांची पोलीस कोठडीही न्यायालयाने रद्द करून त्यांची सुटका केली आहे.
वैयक्तिक सूडभावनेतून सहा जणांना नाहक गोवणाºया महिलेवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिली. यासंदर्भात न्यायालयात ब पत्राचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरच या महिलेवरही कारवाई होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक बागवान यांनी वर्तवली आहे.

 

Web Title: The gang rape of 'So' made!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.