दरोडा टाकणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 05:25 AM2018-09-23T05:25:10+5:302018-09-23T05:25:29+5:30
नाशिक महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकास लुटणाºया आठ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ ने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. तसेच ही टोळी जनावरे चोरी करून त्यांची विक्री करत असल्याचेही उघडकीस आले आहे.
ठाणे - नाशिक महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकास लुटणाºया आठ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ ने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. तसेच ही टोळी जनावरे चोरी करून त्यांची विक्री करत असल्याचेही उघडकीस आले आहे.
त्यांच्याकडून एक कार, रोख रक्कम, पाच मोबाइल आणि जनावरांना गुंगी देणाºया औषधांच्या तीन बाटल्या, इंजेक्शन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीचा फरार म्होरक्या अकबर शौकत शेखचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कळवा पोलीस ठाण्यात १६ सप्टेंबर रोजी फिर्यादी सोहेल शेखच्या तक्रारीनुसार, दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. सोहेल आणि त्याचे मालक नौशाद अहमद शेख हे ११ सप्टेंबर रोजी डोंगरी येथून मालाचे पैसे घेऊन संगमनेरकडे जात होते. खारेगाव टोलनाक्यावर त्यांच्या गाडीसमोर एक कार आडवी लावून सात ते आठ जणांनी जबरदस्तीने गाडीचा ताबा घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मारहाण केली. त्यांच्याकडून रोकड आणि मोबाइल व कार असा चार लाख ४२ हजारांचा ऐवज घेऊन ते पळून गेले. या प्रकरणी कळवा पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना यातील आरोपी चोरलेल्या मुद्देमालासह कर्नाटक येथील गुलबर्गा येथे पळून गेल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ या पथकाला मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने १५० लॉजच्या केलेल्या तपासणीत एका लॉजमध्ये काही जण मुंबईतील असल्याचे कळले. त्यांच्यावर नऊ तास पाळत ठेवून भिवंडीतील मोजम शब्बीर शेख (२४), अबू फैसल अब्दुल रशीद अन्सारी (२२), सय्यद वाजीद सय्यद मुसा (३०), फिरोज अकबर सय्यद (२४) या चौकडीला अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून तेथील गेसुधाराज लॉज येथून मोहम्मद हुसैन अब्दुल रहिमान शेख (३३), मोहम्मद शाकीर मोहम्मद कासीम शेख (४०) आणि वाहिद शौकत शेख (२२) या तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ंह्याची क बुली दिली असून त्यांना फि र्यादी सोहेल याचा मित्र आवेज ऊर्फ चिन्या याने वेळोवेळीच्या ठावठिकाणांबाबत माहिती दिल्याचे सांगितल्यावर त्यालाही अटक केली. त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.