ठाण्यात पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 08:50 PM2021-02-08T20:50:18+5:302021-02-08T21:04:50+5:30

कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाºया प्रवाशांना लुटणा-या मोहम्मद हयात सय्यद (३०, रा. मुंब्रा), मुस्तफा पावसकर (३७, रा. श्रीलंका, मुंब्रा) आणि मुज्जमील उर्फ गुड्डू उर्फ हॉरर शेख (२४, रा. मुंब्रा) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केली. हे तिघेही चोरी आणि जबरी टोळीतील सराईत गुन्हेगार असून यातील मोहम्मद सय्यद याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात पाच तर नांदेड येथील लकडगंज पोलीस ठाण्यात दरोडयाचा एक असे सहा गुन्हे नोंद आहेत.

A gang of robbers was arrested in Thane in the early hours of the morning | ठाण्यात पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

लॅपटॉपसह ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Next
ठळक मुद्दे डायघर पोलिसांची कारवाईलॅपटॉपसह ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाºया प्रवाशांना लुटणाºया मोहम्मद हयात सय्यद (३०, रा. मुंब्रा), मुस्तफा पावसकर (३७, रा. श्रीलंका, मुंब्रा) आणि मुज्जमील उर्फ गुड्डू उर्फ हॉरर शेख (२४, रा. मुंब्रा) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून जबरी चोरीतील लॅपटॉपसह ६५ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
डायघर गावातील रहिवाशी योगेश लोहार हे २२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कल्याणफाटा येथून कळंबोली बस थांबा येथे जात होते. ते दहिसर मोरी येथे आल्यावर रिक्षात बसलेल्या अन्य दोन प्रवाशांनी रिक्षा चालकाशी संगनमताने योगेश यांना हाताने मारहाण केली. नंतर त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल पॉवर बँक आणि रोकड असा २८ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन रिक्षातून उतरुन पसार झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि भूषण कापडणीस यांच्या पथकाने सापळा लावून मोहम्मद सय्यद याच्यासह तिघांना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी या जबरी चोरीची कबूली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून लॅपटॉप, पॉवर बँक, आधारकार्ड आणि जबरी चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांनाही ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
* हे तिघेही चोरी आणि जबरी टोळीतील सराईत गुन्हेगार असून यातील मोहम्मद सय्यद याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात पाच तर नांदेड येथील लकडगंज पोलीस ठाण्यात दरोडयाचा एक असे सहा गुन्हे नोंद आहेत. पावसकर याच्याविरुद्ध मुंबई ठाण्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून अन्यही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: A gang of robbers was arrested in Thane in the early hours of the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.