भटक्या गायी चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय

By admin | Published: July 30, 2015 11:03 PM2015-07-30T23:03:46+5:302015-07-30T23:03:46+5:30

अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्यावेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे.

The gang of thugs cows stealer activated | भटक्या गायी चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय

भटक्या गायी चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय

Next

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्यावेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. या गायी चोरुन त्यांच्या मांसाची विक्री करण्यात येत आहे. या गाय चोरांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात भटक्या गायींचे प्रमाण मोठे आहे. दिवसभर चरल्यानंतर रात्री ह्या गायी विसाव्यासाठी मोकळ्या मैदानांवर बसतात. या गायींच्या कळपातील किमान एका गायीला चोरुन नेण्याचा सपाटा काही समाजकटंकांनी सुरु केला आहे. चोरलेल्या गायीची विक्री थेट मास विक्रेत्यांकडे करण्यात येत आहे. तर काही मास विक्रेत्यांनीच स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा गाय चोरण्यासाठी उभारली आहे. अंबरनाथमधील चिंचपाडा, कोहजगांव, शास्त्रीनगर, बुवापाडा, मोरीवली, नालंबी गांव परिसर, शिवाजीनगर, लोकनगरी, हरीओम पार्क परिसर, चिखलोली गांव या परिसरातील भटक्या गायी चोरण्यासाठी ही टोळी रात्रीच्यावेळी सक्रिय असते. असाच प्रकार बदलापूरातही घडत आहे.
रात्री १२ नंतर या टोळीतील दोघे दुचाकीवरुन गायींच्या कळपांची पाहणी करतात. एकांत मिळताच त्यातील मागे बसलेला चोर या गायींपैकी एखाद दुसऱ्या गायीला बेशुध्द करणारे औषध असलेले पाव देऊन बेशुध्द करतात. चार चाकी गाडीतून काही चोरटे गायीजवळ आल्यावर काही क्षणात या गायींचे पाय बांधून त्यांना अवघ्या मिनिटभरातच गाडीत कोंबतात. त्यासाठी हे दुचाकीस्वारही त्यांना मदत करतात. खास गाय चोरण्यासाठी ही गाडी तयार करण्यात आलेली असते. चोरलेल्या गायी याच परिसरातील मास विक्रेत्यांकडे पाठविण्यात येतात. गाय चोरण्याचा हा प्रकार लक्षात आल्यावर कोहजगांवातील ग्रामस्थांनी गाय चोरांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे.
चिंचपाडा आणि कोहजगांव परिसरातील भटक्या गायींना एकत्रित करुन त्यांचे संरक्षण करण्याचे काम गावातील तरुणांना देण्यात आले आहे. हे तरुण देखील रात्रभर जागून या गायींचे संरक्षण करित आहेत. आता पोलीस देखील याच तरुणांची मदत घेत आहेत. पोलीसांना रात्रीच्यावेळी एखादी गाय बेशुध्द अवस्थेत दिसल्यास त्याची माहिती स्वत: पोलीस या तरुणांना देतात. ही माहिती मिळाल्यावर गायींना शुध्दीवर आणून त्यांना संरक्षित ठिकाणी हे तरुण नेतात. कोहजगांवातील तरुणांनी सुरु केलेले काम आता अंबरनाथच्या इतर परिसरातही सुरु केल्यास गाय चोणा-यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The gang of thugs cows stealer activated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.