मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला महागिरीतून अटक
By जितेंद्र कालेकर | Published: December 2, 2023 07:18 PM2023-12-02T19:18:29+5:302023-12-02T19:18:46+5:30
ठाणे गुन्हे शाखेने ही कामगिरी केली असून ठाणेनगर पाोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे: मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या अफसर इकबाल पिंजारी ( ४७, रा. महागिरी, ठाणे) या गुंडाला पुन्हा जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी शनिवारी दिली.
ठाण्यातील महागिरी भागात राहणाऱ्या पिंजारी याच्याविरुद्ध हाणामारीसह गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यासाठी ठाणे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी त्याला ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड आणि पालघर या चार जिल्हयातून दोन वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश १२ मे २०२३ रोजी दिले होते. तरीही तो विनापरवानगी ठाण्यातील महागिरी भागात फिरत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्याच आधारे १ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.