गणपती बाप्पा पावला ! ठाण्यातील शिक्षकांना गणेशोत्सवापूर्वीच मिळणार वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 02:56 PM2017-08-23T14:56:52+5:302017-08-23T15:00:02+5:30
ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असून बाप्पानं त्यांना प्रसादही दिला आहे. येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना गणेशोत्सवापूर्वीच वेतन मिळणार असून शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यामुळे गुरुवारी कर्मचा-यांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.
ठाणे, दि. 23 - ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असून बाप्पानं त्यांना प्रसादही दिला आहे. येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना गणेशोत्सवापूर्वीच वेतन मिळणार असून शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्यामुळे गुरुवारी कर्मचा-यांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवपूर्वीच वेतन मिळावे, यासाठी मागील आठवड्यात शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्याचा आग्रहदेखील त्यांनी धरला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत ही मागणी मान्य केल्याने शिक्षकांचा गणेशोत्सव आता अगदी आनंदात साजरा होणार आहे.
ज्या शाळांनी आपले वेतन देयके वेळेत सादर केले आहेत अशा सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक आठवडापूर्वीच वेतन मिळणार आहे.