गुरुला शिष्याची गानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 04:44 PM2018-04-08T16:44:15+5:302018-04-08T16:44:15+5:30
गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांनी गायिलेल्या उर्दू, हिंदी, कन्नड, संस्कृत रचना सादर करीत त्यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांनी आपल्या गुरूला स्वरांजली वाहिली
कल्याण- गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांनी गायिलेल्या उर्दू, हिंदी, कन्नड, संस्कृत रचना सादर करीत त्यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांनी आपल्या गुरूला स्वरांजली वाहिली. प्रेक्षकांनी फारश्या न ऐकलेल्या किशोरीताईच्या दुर्मिळ रचना ऐकताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते ते रमलखुण आणि सुभेदारवाडा कट्टा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरांजली’ या कार्यक्रमाचे.
सुभेदारवाडा हायस्कूलच्या पटांगणात या कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. पं. रघुनंदन पणशीकर यांनी मैफीलीत रंग भरले. प्रेक्षकांकडून गाण्याच्या फमाईश येत होत्या. त्या फमाईश पूर्ण करण्याचा ही प्रयत्न पणशीकर यांनी केला.
पणशीकर यांनी भजन सादर करून कार्यक्रमाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ‘‘मेरे तो गिरधार गोपाळ’’ हे गीत सादर केले. अमोणकर या प्रयोगशील होत्या. सतत त्यांचे प्रयोग सुरू असत. त्यातूनच त्यांनी वेस्टर्न म्युङिाकचा प्रभाव असलेली रचना तयार केली होती ती रचना पणशीकर यांनी सादर केली. ‘‘तुम्हारे कारण सर्वसुख छोडा, अब मोहिनी तु तरसावा’’ ही त्यांची वेस्टर्न बाज असलेली रचना ऐकताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. गुरुनानकांचे भजन ‘‘काहे रे बन गोजण जाये’’ हे सादर करून पणशीकर यांनी सारे वातावरण भक्तीमय केले. राजस्थानी फोक हे वैशिष्टय़ असलेले मीराबाईंचे भजन ‘‘आली मन न लागे वृंदावन’’ हे सादर केले. अमोणकर यांनी निगुणी भजनाप्रमाणो उर्दू गझलचा अभ्यास केला होता. 80- 90 च्या दशकात त्यांनी हा अभ्यास केला. त्या संगीताचा विविध पध्दतीने अभ्यास करीत असत. त्यांनी कन्नडमध्ये गायिलेल्या दोन ते तीन रचना ही त्यांनी सादर केल्या. पणशीकर यांनी ‘तमन्ना हो तो जिंदा आरजू को जवा कर दो’’ आणि ‘‘दिल के बहलाने की तकदीर तो है, तू नही है तेरे तस्वीर तो है’’ या गझल सादर करून प्रेक्षकांवर गारूड घातले. याशिवाय ‘जमाना याद तेरा ये दिल नादान आणि ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ या गझल त्यांनी सादर केल्या. प्रेक्षकांच्या आग्रहखातर संस्कृत रचना असलेला श्लोक सादर केला. किशोरी अमोणकर यांनी 2 ते 3 भावगीते ही गायिली होती. त्यातील एक भावगीत ज्यांची रचना शांता शेळके यांची असून हदयनाथ मंगेशकर यांनी त्याला संगीत दिले आहे. ‘जाईन विचारत रानफुला ’ हे सादर करताच प्रेक्षकांनी टाळ्य़ाच्या कडकडाटात दाद दिली.
फोटो आहे.