भाजपतर्फे देशभरात 'गाव चलो अभियान'

By अजित मांडके | Published: February 3, 2024 03:46 PM2024-02-03T15:46:42+5:302024-02-03T15:47:04+5:30

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष वाघुले बोलत होते.

'Gaon Chalo Abhiyan' by BJP across the country | भाजपतर्फे देशभरात 'गाव चलो अभियान'

भाजपतर्फे देशभरात 'गाव चलो अभियान'

ठाणे : भाजपतर्फे देशभरात `गाव चलो अभियान' राबविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर भाजपतर्फे शहरात ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी 'घर चलो अभियान' राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी शनिवारी दिली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष वाघुले बोलत होते. या वेळी भाजपाचे आमदार संजय केळकर, यांची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षांची कामगिरी पूर्ण झाली आहे. सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. त्यात गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरातील प्रत्येक बूथवरील लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाला ४ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून, ते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या ११ फेब्रुवारी रोजीच्या स्मृतीदिनापर्यंत सुरू राहील. पंडित दिनदयाळ यांच्या स्मृतींना अभियान समर्पित केले जाणार आहे. या अभियानात पक्षाचे शहरातील माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, प्रकोष्टचे संयोजक, वॉरियर्स, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मंडल अध्यक्ष आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या अभियानात सहभागी कार्यकर्त्यांना `प्रवासी कार्यकर्ता' म्हणून संबोधण्यात येणार आहे. तर शहरातील एक हजार मतदारांच्या बूथवरील लाभार्थीपर्यंत पोचण्यात येणार आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी सर्व माहिती मतदारांपर्यंत पोचविण्यात येईल. तसेच मोदीची  गॅरंटी काय आहे? हे प्रत्येक नागरिकाला माहितीपत्राद्वारे सांगण्यात येईल, अशी माहिती वाघुले यांनी दिली.

Web Title: 'Gaon Chalo Abhiyan' by BJP across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.