सफाई कर्मचाºयांअभावी भिवंडीत कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:14 AM2017-07-27T00:14:51+5:302017-07-27T00:14:51+5:30
सफाई कामगारांनी राजकीय बळाचा वापर करून व वरिष्ठ अधिकाºयांच्या संगनमताने वरिष्ठपदाच्या खुर्च्या बळकावल्या आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी कर्मचारी कमी असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे
भिवंडी : सफाई कामगारांनी राजकीय बळाचा वापर करून व वरिष्ठ अधिकाºयांच्या संगनमताने वरिष्ठपदाच्या खुर्च्या बळकावल्या आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी कर्मचारी कमी असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या आस्थापना विभागात सुमारे २४०० सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी किमान १००० ते १२०० कर्मचारी वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मुख्य कार्यालयात आणि पाच प्रभाग समिती कार्यालयामध्ये वरिष्ठ पदांवर काम करत आहेत. वास्तविक शहराच्या लोकसंख्येनुसार सफाई कर्मचाºयांची भरती झालेली असताना ते या विभागात काम करत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास भोगावा लागत आहे. शहरात रोज कचरा उचलला जात नाही. तसेच गटारे, नाले साफ होत नाहीत. त्यामुळे अस्वच्छतेमुळे मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू सारख्या साथीचे आजार पसरले आहेत.
ज्यांची मूळ पदे सफाई कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी काम करण्याचे आदेश अनेकवेळा दिलेले असताना त्या कामगारांनी औद्योगिक न्यायालय आणि उच्च न्यायालयात प्रशासनाविरोधात दावे दाखल केले. या दाव्यांचा निकाल देताना दोन्ही न्यायालयांनी या कामगारांना आरोग्य विभागातील मूळपदीच काम करावे,असे निर्णय दिलेले आहेत. परंतु महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. जे काही सफाई कर्मचारी आरोग्य विभागामध्ये हजर झाले आहेत ते सफाईचे काम करत नाही. अशा सफाई कर्मचाºयांना आरोग्य निरीक्षक व आरोग्य अधिकारी सांभाळण्याचे काम करतात असा आरोप होत आहे.
संबंधित अधिकाºयांना बडतर्फ करा!
आदेशाचे पालन न करणारे सफाई कामगार, केबिन आरोग्य अधिकारी व याचा अहवाल न देणारे सफाई निरीक्षक यांना त्वरित बडतर्फकरावे,अशी मागणी लोकहित विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनद्वारे केली आहे.