दळखणमध्ये इ-रिक्षाद्वारे गोळा होणार कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:45 AM2019-07-25T00:45:25+5:302019-07-25T00:45:37+5:30
ग्रामपंचायतीचा उपक्रम : पर्यावरणाला दिले महत्त्व, चार तास चार्ज केल्यावर १०० किलोमीटर धावणार
आसनगाव : शहापूर तालुक्यातील दळखण ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच भगवान मोकाशी यांनी लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती असल्यास गावाचा कायापालट कसा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. सोमवारी गावात इ-रिक्षाद्वारे कचरा गोळा करणाऱ्या सुविधेचे उद्घाटन करून दळखण ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यात पहिली ठरली आहे. या अनोख्या उपक्र माबद्दल मोकाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
ठाणे जिल्ह्यात पहिली इ-रिक्षा म्हणजेच इंधन विरहीत इलेक्ट्रिकवर चालणारी व पर्यावरणमुक्त अशा इ-रिक्षाद्वारे कचरा गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ४ तास चार्ज केल्यावर १०० किलोमीटर चालते. ओला व सुका कचरा गोळा करणारी ही इ-रिक्षा वापरणारी दळखण ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली ठरली आहे.
ग्रूप ग्रामपंचायत दळखणतर्फे इ-रिक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रभारी सरपंच मोकाशी, मंगला डोके, माजी उपसरपंच दिगंबर म्हसकर, भाई देहेरकर, विनायक आपटे, रफिक सय्यद, तुकाराम सरखोत, मधुकर मोकाशी, तुकाराम सरखोत, शरद सरखोत, चंद्रकांत म्हसकर, भाऊसाहेब भेरे, पांडुरंग मोकाशी, प्रवीण सरखोत, मारु ती मोकाशी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
या आहेत अन्य सुविधा
दळखण गावामध्ये करण्यात आलेल्या सोयीसुविधा व विकासकामामध्ये विविध योजनेअंतर्गत गरीब व गरजूंना त्यांचे हक्काचे घरे, स्वच्छतागृह, रस्त्यांची कामे, पेव्हर ब्लॉक बसवणे, तरूणांना खेळाचे साहित्य देणे, आरोग्य शिबिर, व्यायामशाळा, प्रत्येक कुटुंबास कचºयाचे डबे देणे, वृक्षारोपण करणे आदी उपक्रम राबवले आहेत. ग्रामपंचायत तसेच कोणत्याही सुविधेबाबत तक्र ार असेल तर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण गावात सीसीटीव्ही लावले असून प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे ८ हायमास्ट बसवण्यात आले आहेत.