ऐन गणेशोत्सवात ठाण्यात कचराकोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:15+5:302021-09-09T04:48:15+5:30
ठाणे : विस्कटलेल्या आर्थिक घडीचा फटका आता ठाणे महापालिकेच्या इतर सेवांनादेखील बसू लागला आहे. यात घरोघरी जाऊन कचरा ...
ठाणे : विस्कटलेल्या आर्थिक घडीचा फटका आता ठाणे महापालिकेच्या इतर सेवांनादेखील बसू लागला आहे. यात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या कचरा वेचकांचा पगार झाला नसल्याने त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून कचरा गोळा करणे बंद केले आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवासह कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात कचराकोंडी होण्याची शक्यता आहे.
बुधवारी झालेल्या महासभेत ठाणे महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक हनमंत जगदाळे यांनी कचरावेचकांचा पगार झाला नसल्याने त्यांनी तीन दिवसांपासून कचरा उचलण्याचे बंद केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी घंटागाडी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी कचरावेचकांची नियुक्ती केली आहे. घरोघरी जाऊन ते कचरा गोळा करून आणत असतात. आता एक तर गणेशोत्सव तोंडावर असताना दुसरीकडे कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेची घोषणा आली असताना नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.