एसटीच्या कळवा वर्कशॉपमध्ये कचऱ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:06+5:302021-04-24T04:41:06+5:30
ठाणे : एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना शहरात आगीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. एसटी महामंडळाच्या कळवा येथील वर्कशॉपमध्ये ...
ठाणे : एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना शहरात आगीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. एसटी महामंडळाच्या कळवा येथील वर्कशॉपमध्ये बाहेरील बाजूस ठेवलेल्या कचऱ्याला शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीमने धाव घेत ती आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
या ठिकाणी कळवा एसटी वर्कशॉपमधील स्क्रप साहित्य येथे टाकले जात होते. या कचऱ्याच्या बाजूलाच लागून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची भिंत आहे. परंतु, सुदैवाने ही आग वेळीच आटोक्यात आणण्यात आल्याने मोठी हानी टळली आहे. तसेच या वर्कशॉपमध्ये सुमारे २०० च्या आसपास कर्मचारी कामाला असतात, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली. आगीचे ठिकाण आणि वर्कशॉप येथील अंतर जास्तीचे असल्याने कर्मचारीदेखील वर्कशॉपमध्ये सुखरूप होते.