कल्याण-डोंबिवलीतील कचरा ४० टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:51 PM2020-04-23T23:51:28+5:302020-04-23T23:51:55+5:30

३४० टन होतोय गोळा; लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम, मात्र डम्पिंगवर ढीग कायम

Garbage in Kalyan-Dombivali reduced by 40% | कल्याण-डोंबिवलीतील कचरा ४० टक्क्यांनी घटला

कल्याण-डोंबिवलीतील कचरा ४० टक्क्यांनी घटला

googlenewsNext

- मुरलीधर भवार 

कल्याण : सध्याच्या लॉकडाउनमुळे शहरांतील केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला मार्केट, किराणा, बेकरी आणि औषधांची दुकाने सुरू आहेत. अन्य दुकाने, बाजारपेठा, कारखाने, उद्योग व इतर अस्थापने बंद असल्याने कल्याण-डोंबिवली शहरांतील कचऱ्याचे प्रमाणही ४० टक्क्यांनी कमी झाले आहे.

पूर्वीच्या तुलनेत सध्या दररोज ३५० टन कचरा गोळा केला जात आहे. केडीएमसी हद्दीतून दररोज ६५० टन कचरा गोळा केला जातो. परंतु, त्यात ४० टक्क्यांनी घट झाल्याने ३५० टन कचरा डम्पिंगवर जात आहे. महापालिकेसाठी ही बाब समाधानकारक असली तरी आधारवाडी डम्पिंगवरील कचºयाचा डोंगर कमी झालेला नाही. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे डम्पिंग १५ मे पर्यंत बंद केले जाईल, असे सांगितले होते. परंतु, कोरोनामुळे महापालिकेची सगळी शक्ती कोरोनाशी मुकाबला करण्यावर खर्ची होत आहे. त्यामुळे हे डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य साध्य करता येणे शक्य नाही. मात्र, लॉकडाउनच्या काळात कचरा कमी झाला आहे.

सध्या घरी असलेल्या नागरिकांनी ओला-सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्यास चित्र बदलू शकते, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त गणेश बोराडे यांनी सांगितले.

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी सौराष्ट्र कंपनीने प्रक्रिया प्रकल्प उभारला होता. मात्र, प्रक्रिया करण्यात येणाºया कचºयाचे प्रमाण १०० ते १५० टन होते. तर येथे येऊन पडणारा कचरा ६५० टन आहे. त्यामुळे कचºयाचा डोंगर कमी होऊ शकला नाही. महापालिकेने उंबर्डे, बारावे आणि मांडा येथे प्रकल्प प्रस्तावित केले. त्यापैकी बारावे प्रकल्पाचे काम सुरू आहे. उंबर्डे प्रकल्प बांधून तयार असून, तेथे कचºयावर प्रक्रियेचे काम सुरू होणार होते.

परंतु, सध्याच्या लॉकडाउनमुळेप्रकल्पातील कामगार गावी गेल्याने प्रकल्पाचे काम ठप्प झाले. सोमवार, २७ एप्रिलपासून या प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे, अशी माहिती केडीएमसीचे अभियंते मिलिंद गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोनाच्या दोन हजार ४०४ किलो कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया
कोरोनाग्रस्तांच्या घरातील व सोसायटीतील कचरा स्वतंत्र वाहनातून काळजीपूर्वक गोळा करून त्याची जैववैद्यकीय कचरा प्रकल्पात शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका हद्दीतील २० प्रभागांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाग्रस्तांच्या घरातील व सोसायटीमधून आतापर्यंत दोन हजार ४०४ किलो कचरा गोळा करून त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्याचा अहवाल अभियंता गोपाळ भांगरे यांनी केंद्रीय आरोग्य विभागास आॅनलाइनद्वारे पाठविला आहे. केंद्राकडून याबाबत महापालिकेस विचारणा करण्यात आली होती.

Web Title: Garbage in Kalyan-Dombivali reduced by 40%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.