कचरा उचला अन्यथा..., रहिवाशांची आक्रमक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:07+5:302021-09-03T04:43:07+5:30
उद्यापर्यंत पालिका प्रशासनाने कचरा उचलण्याची कारवाई करावी, अन्यथा जमा झालेला कचरा पालिका मुख्यालयाबाहेर आणून टाकला जाईल, अशा इशारा मोरिवली ...
उद्यापर्यंत पालिका प्रशासनाने कचरा उचलण्याची कारवाई करावी, अन्यथा जमा झालेला कचरा पालिका मुख्यालयाबाहेर आणून टाकला जाईल, अशा इशारा मोरिवली पाडा परिसरातील नागरिकांच्या संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने सुनील नायर यांनी दिला आहे. रहिवाशांच्या आक्रमक भूमिकेमुळे नगरपालिकेचे अधिकारी गोंधळात पडले. त्यामुळे पालिका प्रशासनानेही नरमाईची भूमिका घेऊन कचरा उचलण्यास तयारी दाखवल्याची माहिती संयुक्त संघर्ष समितीच्या सदस्यांनी दिली आहे.
पूर्वेकडील अंबर हाइट्स, ग्रीन सिटी, मोतीराम प्राईड, एक्वा मारिन, विश्वजित मेडोज, अष्टविनायक संकुल, शुभ रेसिडेन्सी, विश्वजित ग्रीन यासारख्या मोरिवली परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा उचलण्यात आला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
-------
नगरपालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात नोटिसा बजावण्याआधी सर्व सोसायटींना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता थेट आदेश काढल्याने आता पालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
सोसायट्यांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सक्ती करणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेने आजपर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया करणारी कोणतीही यंत्रणा उभारली नाही. एवढेच नव्हे तर अनेक प्रभागांत गांडूळ खत प्रकल्प उभारल्यानंतर ते सहा महिन्यांपेक्षा जास्त होऊनही काळ चालू होऊ शकलेले नाही.
-----------