जशास तसे! ते कचरा टाकतात म्हणून यांनीही कचरा टाकला, पोलिसांनी गुन्हा दाखल केला!
By सदानंद नाईक | Published: November 18, 2022 02:53 PM2022-11-18T14:53:36+5:302022-11-18T14:54:08+5:30
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्हासनगर : कॅम्प नं-२ गोलमैदान येथील हिरापन्ना इमारती मधील नागरिक खाली कचरा फेकतात. या रागातून शेजारील महाकाली चाळीतील रोहित गमलाडू यांच्यासह १२ ते १४ नागरिकांनी इमारतीच्या तळमजल्यावर, लिफ़्ट, सोसायटी कार्यालय आदी ठिकाणी कचरा टाकला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्हासनगर कॅम्प नं-२ ,गोलमैदान परिसरात हिरापन्ना नावाची इमारत आहे. इमारत शेजारी महाकाली चाळ आहे. इमारत मधील नागरिक खाली कचरा फेकत असल्याने, कचरा महाकाली चाळीत पडतो. त्या रागातून चाळीतील रोहित गमलाडू, अमेय गमलाडू, संध्या घोडके, अनिता पवार यांच्यासह १० ते १२ नागरिकांनी बुधवारी रात्री साडे अकरा वाजता पिशव्या व गोणीत भरून आणलेला कचरा, दगड, विटा इमारत खाली, लिफ़्ट, सोसायटी कार्यालय काही जणांच्या घरा समोर टाकला. गुरुवारी सकाळी इमारती मधील नागरिकांनी इमारतीवर दगडाचा मारा झाल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकारने एकच खळबळ उडाली होती.
उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे खरा प्रकार उघड केला. इमारती मधील नगरीत खालील चाळीत कचरा फेकतात. या रागातून चाळीतील नागरिकांनी कचरा हिरापन्ना इमारती मध्ये टाकून अस्वच्छ वातावरण केले. याप्रकरणी पोलिसांनी रोहित गमलाडू, अमये गमलाडू, संध्या घोडके, अनिता पवार यांच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला. दिवाळीच्या वेळी एका अल्पवयीन मुलाने, बिल्डींगच्या दिशेने रॉकेट उडविल्याचा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलावर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा प्रकारही इमारत मधील नागरिक कचरा खाली टाकतात यातूनच अल्पवयीन मुलाने केले होते. इमारती मध्ये कचरा टाकला प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.