दिवंगत रमेश मोरे द्विपात्री अभिनय स्पर्धेत गार्गी-अभिराज प्रथम
By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 16, 2022 03:28 PM2022-08-16T15:28:24+5:302022-08-16T15:29:02+5:30
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे यंदाचे १० वे वर्ष होते.
ठाणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा आयोजित दिवंगत रमेश मोरे द्विपात्री अभिनय स्पर्धेत गार्गी घेगडमूळ, अभिराज भोसले या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, द्वितीय क्रमांक करिष्मा अनंत व आरती गुरव तर तृतीय क्रमांक सचिन सपकाळ आणि गणेश पाटील यांनी पटकावला.
मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे यंदाचे १० वे वर्ष होते. गेले दोन महिने सातत्याने या स्पर्धेची तयारी सुरू होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह आनंददायी होता. एकूण अठरा जोड्या द्विपात्री स्पर्धेत सहभागी झाल्या. सिने, मालिका अभिनेत्री पल्लवी वाघ केळकर, शिरीष राणे, आणि महेश सावंत पटेल यांंनी स्पर्धेचे परिक्षण केले. उत्तेजनार्थ पारितोषिक सिद्धेश शिंदे, स्वप्निल अदरकर, अक्षता साळवी, रसिका पवार यांनी पटकावले. साक्षी देशपांडे ही विशेष लक्षवेधीची मानकरी ठरली. विजेत्या स्पर्धेकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्तमोत्तम कलाकृती या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता आल्या.
दैनंदिन जीवनातील अनेक विषय संहितेच्या माध्यमातून स्पर्धकांनी मांडले. या स्पर्धेचे अचूक टायमिंग साधण्यात आले हे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे अध्यक्ष, खा. राजन विचारे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, प्रमुख कार्यवाह नरेंद्र बेडेकर, कोषाध्यक्ष आशा जोशी तसेच पद्मा हुशिंग, शितल पाटील, दुर्गेश आकेरकर, अंबरीष ओक, प्रणाली राजे, श्रृतिका मोरेकर, जयश्री पाठक, वृषाली राजे, निशिकांत महांकाळ, आदित्य संभुस, प्रकाश बोर्डे याप्रसंगी उपस्थित होते.