मुंब्रा येथे कपड्याच्या दुकानाला आग; आगीत दोन दुकानांमधील वस्तू खाक
By कुमार बडदे | Published: April 29, 2024 12:43 PM2024-04-29T12:43:55+5:302024-04-29T12:44:33+5:30
दहा बाय दहा फूट आकाराच्या कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.
मुंब्राः येथील दोन कपडे विक्रीच्या दुकानांना लागलेल्या आगीत दुकानातील कपडे तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या.मुंब्रा शहरातील कौसा भागातील नशेमन काँलेनी परीसरातीलएका एका हाँटेलच्या जवळ असलेल्या दहा बाय दहा फूट आकाराच्या कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.
याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी एक फायर आणि दोन हायराईज फायर वाहनांच्या मदतीने अल्पावधित आग पूर्णपणे विझवली.या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु भाडेतत्वावर दुकान चालवत असलेल्या अब्दुल लतिफ आणि मोहम्मद शेख या दोघांच्या दुकानातील कपडे,कपाट,विद्युत वायरींग,वातानाकुलित यंत्र(एसी) पूर्णपणे जळून खाक झाले असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.
दरम्यान सदरच्या दुकानांमधील आग शाँर्टसर्किटमुळे लागल्याची तसेच दोन दुकानांमधील लाकडी पार्टिशनमुळे ती दुस-या दुकानामध्ये पसरल्याची माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे स्थानक प्रमुख एन.वाय.शिंदे यांनी लोकमतला दिली.