खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील गॅस सिलिंडर कारवाई थंडावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 07:03 PM2019-01-16T19:03:29+5:302019-01-16T19:03:37+5:30

कल्याणमध्ये चायनीज बनवणा-या खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी गॅस सिलिंडर स्फोटामुळे अपघाताची घटना झाल्यानंतर महापालिका हद्दीतील गाड्यांवरील गॅस सिलिंडवर कारवाई करण्यात आली होती.

The gas cylinders in the food handling have stopped | खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील गॅस सिलिंडर कारवाई थंडावली

खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरील गॅस सिलिंडर कारवाई थंडावली

googlenewsNext

डोंबिवली: कल्याणमध्ये चायनीज बनवणा-या खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी गॅस सिलिंडर स्फोटामुळे अपघाताची घटना झाल्यानंतर महापालिका हद्दीतील गाड्यांवरील गॅस सिलिंडवर कारवाई करण्यात आली होती. मात्र अवघ्या आठवडाभरात ती कारवाई थंड झाली असून सर्रासपणे सर्वत्र पुन्हा उघड्याववर गॅस सिलिंडरवर खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे आढळून येत आहे.

डोंबिवलीमध्ये ग आणि फ प्रभागामध्ये उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणा-या गाड्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वडापाव विक्रेते, चहाचा व्यवसाय करणा-यांचा समावेश आहे. त्या व्यावसायिकांकडे गॅस सिलिंडरचा सर्रास वापर सुरू आहे. ग प्रभागात एसव्ही रोडवर, कस्तुरी प्लाझानजीक, मानपाडा रोडवर तसेच इंदिरा गांधी चौकामध्येही खुलेआम गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. फ प्रभागातही भगतसिंग रोड, टिळकपथ, तसेच फडके रोड अन्यत्र चहा व्यावसायिकांकडे गॅस सिलिंडर वापरला जात आहे.

ज्वलनशील वस्तूंवर तात्काळ कारवाईचे आदेश असतानाही प्रभाग क्षेत्र अधिका-यांचा कानाडोळा होत असल्याने व्यावसायिक गॅसचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कारवाईत सातत्य नसल्याने आणि काही व्यावसायिकांकडे कानाडोळा केल्यानेच खुलेआम गॅस सिलिंडरचा, स्टोव्हचा वापर केला जात आहे. इंदिरा गांधी चौकातही संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत ज्या हातगाड्या लागतात त्यांच्याकडे गॅस सिलिंडर आढळून येत आहे. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, परंतु प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी, अधिकारी यांची नजर चुकवून सर्रास व्यवसाय करण्यात येत आहे.
=========
गॅस सिलिंडर ठेवण्याची सोय महापालिकेकडे नसल्याने दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येते. त्यामुळे कारवाई थंडावली असे म्हणता येणार नाही. सिलिंडर बाटले आणले तर ते डम्प करण्यासाठी सुरक्षित जागा नाही. त्यातही जर आणले आणि काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, त्यामुळे दंड आकारून संबंधितांना समज दिली जात आहे.
- परशुराम कुमावत, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी

 

Web Title: The gas cylinders in the food handling have stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.