गॅस दरवाढीने गृहिणींच्या संतापाचा उडाला भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:14+5:302021-09-03T04:43:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० ...

Gas price hike sparks outrage among housewives | गॅस दरवाढीने गृहिणींच्या संतापाचा उडाला भडका

गॅस दरवाढीने गृहिणींच्या संतापाचा उडाला भडका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या सतत होणाऱ्या भाववाढीमुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या १० दिवसात एकदमच २५ रुपयाची भाव वाढ बुधवारी झाली. त्यामुळे महिलांना महिन्याकाठी घरखर्च चालविण्यासाठी मिळणाऱ्या रकमेचे अख्खे गणित कोलमडले आहे. त्यामुळे ‘आता फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या की काय!’ असे म्हणत महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्वयंपाकाच्या गॅसची भाववाढ मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरांचे महिन्याचे गणित बिघडले आहे. गेल्या १० दिवस आधी २५ रुपयाची वाढ झाली होता. तिची पुन्हा पुनरावृत्ती होऊन बुधवारी २५ रुपयानी स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले. आठ ते दहा दिवसाच्या आत भाववाढ होऊन गॅसचा भडका होत आहे. त्यातील भाववाढीने सर्वसामान्य होरपळत आहेत. आधीच आर्थिक आवक घटलेली आहे. कामासाठी मुंबईला जायचे म्हटले तरी लोकलचे तिकीट मिळत नाही. त्यात सतत होणाऱ्या या गॅस भाववाढीसह अन्यही अत्यावश्यक वस्तूंची महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचेही हाल होत आहे. सत्ताधाऱ्यांवरील त्यांचा संताप मोठ्या उद्रेकास नियंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसाच्या आधी ८६० ते ८६५ रुपये गॅस सिलिंडरचा भाव होता. गेल्या आठ महिन्यात १५० ते १५५ रुपयाची गॅसची दरवाढ आधीच झालेली असताना, १० दिवसात त्यात पुन्हा २५ रुपयाची भर पडली.

केंद्र शासनाकडून या गॅस भाववाढीसह पेट्रोल, डिझेल भाव नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे लोकांकडून ऐकविले जात आहे. घरगुती गॅसचे भाव वाढविले आहेत. पण रोज नगदी पैशात खेळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांच्या सिलिंडरमध्ये मात्र फारशी भाववाढ केलेली दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घरगुती गॅसच्या किमती मात्र आताही वाढवून सामान्य, गरीब परिवारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जात आहे. कोरोनाच्या या जागतिक संकटात आधीच नोकऱ्या गेल्या आहेत. त्यास तोंड देताना विविध परिवार मेटाकुटीला आले आहेत. सद्यस्थितील तब्बल ८८५ रुपयास सिलिंडर मिळत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करणे या कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक आता गॅसऐवजी सरपणाचा पर्यायी वापर करण्याच्या तयारीत आहेत. तर शहरात महिला फ्लॅटमध्येही चूल पेटविण्याच्या मानसिकतेत आहेत. यातून निघणाऱ्या धुरामुळे रहिवाशांमध्ये पुन्हा तू तू... मै मै होऊन भांडणे वाढणार आहेत. ग्रामीण महिला आता गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत. जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागात सध्या रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यात या गॅससह जीवनावश्यक वस्तू सत्व परीक्षा घेत असल्यामुळे गरिबांचे हाल होत आहेत.

..........

Web Title: Gas price hike sparks outrage among housewives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.