भरधाव गॅस टँकर दुभाजक तोडून थेट रेल्वे रुळांवर; मध्य रेल्वेवर मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 08:41 PM2021-07-05T20:41:05+5:302021-07-05T20:42:45+5:30
सुदैवानं यावेळी रेल्वे ट्रॅकवरून कोणतीही गाडी जात नसल्यानं मोठा अनर्थ टळला
- शाम धुमाळ
कसारा- नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणारा एचपी गॅस कंपनीच्या टँकरचा टायर फुटून अपघात झाला आहे. गॅस टँकर दुभाजक तोडून थेट मुंबई लेनवर जाऊन आटगाव-आसनगाव दरम्यान्या रेल्वे ट्रॅकवर गेला. सुदैवानं यावेळी रेल्वे ट्रॅकवरून कोणतीही गाडी जात नसल्यानं मोठा अनर्थ टळला.
One gas tanker truck from road has entered on track between Atgaon- Asangaon section.For safety reason, t UP & Down lines in North East section have been suspended for traffic frm 7.40pm onwards.Road cranes & other Relief trains/vehicles have been moved to clear the section ASAP.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 5, 2021
आज संध्याकाळी 7 च्या सुमारास नाशिक मार्गे आलेला गॅस टँकर तुर्भे येथे गॅस भरण्यासाठी जात होता. भरधाव वेगात असतानाच टँकरचा टायर फुटला व त्यामुळे टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट मुंबई-नाशिक लेनवरून समोरच्या रेल्वे ट्रॅक वर गेला. सुदैवाने अपघाता कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे मध्य रेल्वेची दोन्ही लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे.