गुण कमी देण्याच्या धाकावर विद्यार्थिनींचा विनयभंग, ठामपाच्या शिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 08:18 PM2017-07-28T20:18:20+5:302017-07-28T20:22:47+5:30

gauna-kamai-daenayaacayaa-dhaakaavara-vaidayaarathainaincaa-vainayabhanga-thaamapaacayaa | गुण कमी देण्याच्या धाकावर विद्यार्थिनींचा विनयभंग, ठामपाच्या शिक्षकाला अटक

गुण कमी देण्याच्या धाकावर विद्यार्थिनींचा विनयभंग, ठामपाच्या शिक्षकाला अटक

Next

ठाणे, दि. 28 - किसननगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकच्या नववीच्या वर्गात शिकवताना मुलींशी अश्लील शेरेबाजी करीत त्यांचा विनयभंग करणा-या सुरेश मोरे (३२) या शिक्षकाला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे. त्याने वर्गातील तीन ते चार मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका मुलीने दाखल केली आहे.

वागळे इस्टेट भागात राहणा-या या पीडित मुलीशी त्याने २४ ते २६ जुलै दरम्यान गैरवर्तन केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या मुलीला अंतर्वस्त्र घातले आहे का? अशी विचारणा करून नंतर तिच्या अंगावरून त्याने हात फिरविला. तिच्या मैत्रिणीशीही त्याने अश्लील संभाषण केले. याबाबत कोणी तक्रार केली तर पेपरमध्ये कमी मार्क देईन, अशी धमकीही त्याने दिली.

या १४ वर्षीय मुलीने धाडस करुन हा प्रकार तिच्या पालकांच्या निदर्शनास आणून दिल्यावर २७ जुलै रोजी त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याने आणखीही चार ते पाच मुलींशी अशाच प्रकारे अश्लील वर्तन केल्याच्या तक्रारी काही मुलींनी पोलिसांकडे केल्या आहेत. त्याला तात्काळ अटक केली असून पालकांनी शाळेच्या मुख्यध्यापकांकडेही याबाबत तक्रार केली आहे.
...............
आधीच गळती त्यात गैरप्रकार..
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आधीच वेगवेगळया कारणांमुळे पटावरील संख्या कमी होत आहे. त्यात अशा प्रकार मोरे सारख्या शिक्षकानेच मुलींशी असे गैरप्रकार केल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी कोपरी येथील पालिकेच्या शाळेतील सुरक्षा रक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन सुरक्षा रक्षक मंडळाच्या सर्वच सुरक्षा रक्षकांना बदलून त्याठिकाणी राज्य शासनाचे सुरक्षा रक्षक पालिकेसह सर्व ठिकाणी तैनात केले. या पार्श्वभूमीवर आता या शिक्षकावर पालिका प्रशासन काय कारवाई करते? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: gauna-kamai-daenayaacayaa-dhaakaavara-vaidayaarathainaincaa-vainayabhanga-thaamapaacayaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.