गावित व्यक्तिगत पातळीवर सर्वात उजवे

By admin | Published: February 6, 2016 02:02 AM2016-02-06T02:02:24+5:302016-02-06T02:02:24+5:30

१३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीतील प्रमुख तीन उमेदवारांपैकी व्यक्तिगत पातळीवर सर्वात उजवे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांच्या नावाची चर्चा सध्या

Gavit Individually at the right level | गावित व्यक्तिगत पातळीवर सर्वात उजवे

गावित व्यक्तिगत पातळीवर सर्वात उजवे

Next

पालघर: १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीतील प्रमुख तीन उमेदवारांपैकी व्यक्तिगत पातळीवर सर्वात उजवे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या राजेंद्र गावितांच्या नावाची चर्चा सध्या मतदारांमध्ये दिसून येत आहे. सेनेचे अमित घोडा यांना आपल्या व्यक्तिगत करिश्म्याऐवजी उपयोगी पडणारा आहे तो वडिलांचा वारसा आणि साहजिकच सेनेचे पाठबळ. त्यांची स्वत:ची राजकीय, सामाजिक कार्यातही तशी विशेष ओळख नसल्याने घोडा यांच्या दृष्टीने ही थोडीशी कमकुवत बाजू समजली जात आहे. तर, मनीषा निमकर यांचे नाव सर्वत्र परिचित होते, ते सेनेच्या आमदार व राज्यमंत्री म्हणूनच असले तरी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशासनावर वचक निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनच त्यांची ओळख आहे.
राजेंद्र गावित यांच्याबाबत मात्र बहुतांशी मतदारांमध्ये त्यांच्याबाबत आपुलकीची व आपलेपणाची भावना दिसून येते. भाजपाचे राम नाईक यांच्या काळात पक्षाबाहेरील मते मिळविण्यात यशस्वी होत असत. तसाच काहीसा प्रकार राजेंद्र गावितांबाबत घडत असल्याचे सांगता येईल. गावित यांना पक्षांतर्गत पाठिंबा आहे. तशीच त्यांना पक्षाबाहेरही एकमान्यता आहे. आपल्या सुखदु:खात कधीही उपलब्ध असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख हे त्यांचे मोठे भांडवल आहे. असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये, अर्थात कोणत्याही पक्षाची बांधीलकी नसणाऱ्या अशा वर्गातून तर त्यांना मान्यता आहेच, परंतु विविध पक्षांतूनही त्यांना मानणारा असा कार्यकर्त्यांचा एक छोटासा का होईना परंतु एक गट आहे. त्यामुळे सेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा सातपाटी, मुरबे, पालघर, टेंभोडे, वेवुर, दापोली, घोलवीरा इ. अनेक भागांतून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गावितांनी सेनेच्या उमेदवारापेक्षा अधिक मते मिळविली आहेत. त्यामुळे सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या या प्रतिमेने त्यांना विजयश्री मिळवून दिली होती आणि २०१४ च्या निवडणुकीमध्ये विजयाजवळ पोहोचविण्यातही त्यांच्या मतदारांमधील या प्रतिमेचे योगदान मोठे आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
पालघर जिल्हानिर्मिती आणि मतदारसंघासाठी विविध मार्गांतून आणलेला निधी त्याचबरोबरीने ज्येष्ठ नागरिक संघासह विविध समाजघटकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा अशा अनेक त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

Web Title: Gavit Individually at the right level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.