दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी गजाआड

By Admin | Published: February 1, 2017 04:05 AM2017-02-01T04:05:35+5:302017-02-01T04:05:35+5:30

भार्इंदरच्या गोल्डन नेस्ट वसाहतीत दीपिका कार्तिक संघवी (२९) व तिची आठ वर्षाची मुलगी हेत्वी यांच्या हत्येप्रकरणी विनायक उर्फ विकी रमेश अपूर (२२) याला

GazaAad accused in double murder case | दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी गजाआड

दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपी गजाआड

googlenewsNext

मीरा रोड : भार्इंदरच्या गोल्डन नेस्ट वसाहतीत दीपिका कार्तिक संघवी (२९) व तिची आठ वर्षाची मुलगी हेत्वी यांच्या हत्येप्रकरणी विनायक उर्फ विकी रमेश अपूर (२२) याला मंगळवारी सकाळी दहिसरमधून अटक केली. विनायक हा दीपिकाचा प्रियकर होता. पैशाच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे समोर आले. दोघींची झोपेत असताना गळयाखाली चाकूने वार करत व गळा आवळून हत्या केल्याची कबूली विनायकने दिली आहे.
दीपिका ही पती कार्तिकसोबत गेल्या फेब्रुवारीपासून राहत नव्हती. घटस्फोट घेणार असल्याने कार्तिक तिला ५ लाख रुपये व महिन्याला ७ हजार रुपये खर्चास देणार होता. पण त्याने पैसे दिले नाही. दीपिका व विकीची ओळख कॉल सेंटर मध्ये काम करताना झाली. त्यांचे संबंध उघड झाल्यानेच दोघांना कॉल सेंटरमधून ८ ते १० दिवसांपूर्वीच काढले होते. भार्इंदर पूर्वेला सोनम सरस्वती इमारतीत राहणाऱ्या दीपिकाकडे विकीचे येणे जाणे होते.
विकी २५ च्या रात्री इमारतीत आला होता. २६ ला सकाळी स्वत:चा चेहरा लपवत तो इमारतीतून बाहेर पडला. त्या रात्री त्याचे दीपिकाशी भांडण झाल्याचे शेजारच्या मुलाने ऐकले होते. रात्री अडीचच्या सुमारास विकीने आधी दीपिकाच्या गळ्याखाली चाकूने वार केला व गळा दाबून हत्या केली. हेत्वी जागी झाल्याने तिचीही गळा आवळून हत्या केली.त्याने हेत्वीचा मृतदेह बिछान्यात गुंडाळून पलंगाच्या कप्प्यात ठेवला आणि जाताना दीपिकाचा मोबाईल घेतला. पण सीसीटीव्हीत त्याचा चेहरा दिसल्याने पोलिसांचे काम सोपे झाले. हत्येनंतर भार्इंदर रेल्वे स्थानक गाठले. चाकू वाटेतच टाकला. पालघर येथे एका नातलगाच्या दिवसकार्याला जायचे असल्याने त्याने आईला फोन करुन विरार स्थानकात कपडे घेऊन येण्यास सांगितले. गाडीतच त्याने कपडे बदलून तो घरी गेला.
पोलिसांनी चौकशी सुरु केल्याचे कळताच त्याने आईने दिलेली सोन्याची चेन दहिसरच्याच सराफाकडे गहाण ठेवून १० हजार घेतले. बसने गोवा गाठले. गोव्याहून तो गाडीने मुंबईत आला. तेथून तो बसने शिर्डीला गेला. विकीने ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधल्यावर पोलीस पथकाने सापळा रचून विकीला रुस्तमजी शाळेजवळ पकडले. (प्रतिनिधी)

दीपिकाने दिली होती आत्महत्येची धमकी
दीपिका त्याच्याकडे २० ते २५ हजार मागत होती. विकी काम करत नसल्याने पैसे देणे शक्य नसल्याने दोघांमध्ये भांडण होत होते. पैसे नाही दिले तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दीपिका देत असे. यातून हत्या केल्याचे त्याने सांगितले. आधी त्याने तिला ४० हजार दिले होते. विकीने यापूर्वी काही मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.

Web Title: GazaAad accused in double murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.