कोरोनाबरोबरच विकासकामांच्या चर्चेसाठी महासभा घ्यावी- नारायण पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 07:19 PM2020-06-28T19:19:41+5:302020-06-28T19:19:52+5:30
महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली मागणी
ठाणे: कोरोनाबरोबरच ठाणो शहरातील विकासकामांच्या चर्चेसाठी तातडीने महासभा घ्यावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.
‘कोरोना’ च्या संसर्गामुळे दरमहा होणा:या महासभा, स्थायी समिती आणि समितीच्या सभा होऊ शकलेल्या नाहीत. महापालिकेतील जनसामान्यांचा आवाज उमटणारी महासभा मार्च महिन्यापासून झालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांना महापालिका प्रशासनाकडे सामान्यांचे प्रश्न मांडताना मोठया अडचणी येत आहेत.
बहुसंख्य नगरसेवकांकडून प्रशासनाला ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जातो. मात्र, पाठविलेल्या ई-मेलची साधी दखलही घेतली जात नाही. तर पत्रंना अगदी उत्तरे देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, हे दुर्देव आहे, असेही नगरसेवक पवार यांनी महापौर म्हस्के यांना पाठविलेल्या पत्रत म्हटले आहे.
कोरोनाप्रमाणोच नालेसफाईसह शहरातील विकासकामांवर चर्चा होण्याची गरज आहे. आगामी काळात नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर-पाणीपट्टी वसूलीतून सवलत देण्याबरोबरच उत्पन्नात लक्षणीय घट झाल्यामुळे उत्पन्नवाढीचे नवे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत महापालिकेच्या अर्थसंकल्पातील योजनांचाही पुनर्विचार करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या पाश्र्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान राखत महासभा घेण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी राज्यात पुणो, नागपूर, भिवंडी महापालिकांच्या सर्वसाधारण सभा झाल्या. राज्यातील काही जिल्हा परिषदांकडूनही व्हच्यरूअल सभा घेण्यात आल्या. काही ठिकाणी निम्मे सदस्य सभागृहात, तर निम्मे सदस्य ऑनलाईनद्वारे कामकाजात सहभागी झाले होते. त्यामुळे ठाणोकरांच्या हिताच्या दृष्टिने महासभा घेण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे.