गंभीर जखमींना डॉक्टरने दाखविले सामान्य जखमी

By Admin | Published: August 17, 2016 02:16 AM2016-08-17T02:16:04+5:302016-08-17T02:16:04+5:30

एका मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले असताना पालिकेच्या तुळींज हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी चक्क सामान्य जखमीचे प्रमाणपत्र दिले

General injuries caused by a doctor showing serious injuries | गंभीर जखमींना डॉक्टरने दाखविले सामान्य जखमी

गंभीर जखमींना डॉक्टरने दाखविले सामान्य जखमी

googlenewsNext

वसई : एका मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले असताना पालिकेच्या तुळींज हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी चक्क सामान्य जखमीचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. डॉक्टरांनी प्रारंभी चुकीचे प्रमाणपत्र दिल्याने तिघांना मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांना गंभीर गुन्हे नोंदवता आले नाहीत.
नालासोपारा येथे ३१ जुलै २०१६ रोजी झालेल्या मारहाणीत बजरंग सिंग, निखिल सिंग आणि निरज सिंग गंभीर जखमी झाल्याने त्यांना तुळींज हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रत्येक जखमींवर वीस टाके घालण्यात आले होते. असे असताना हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या प्रमाणपत्रात सामान्य जखमी असा शेरा मारला होता. त्या विरोधात भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केला आहे. दरम्यान, तुळींज हॉस्पीटलमधील बजरंग सिंग यांचे १५ आॅगस्टला निधन झाले. दरम्यान, सिंग यांचा मृतदेह पोस्टमार्टेम करण्यासाठी नालासोपारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला असता तेथे कायमस्वरुपी स्विपर नसल्याचे ताटकळावे लागले. तसेच स्विपरला पोस्ट मार्टेम केल्याबद्दल दीड हजार रुपेही द्यावे लागल्याची तक्रार बारोट यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: General injuries caused by a doctor showing serious injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.