अपघात रोखण्यासाठी लवकरच ‘जिओ टॅगिंग’, माळशेज घाटासह ठाणे-पालघर जिल्ह्यात अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉटस् ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:45 PM2017-10-22T22:45:59+5:302017-10-22T22:46:16+5:30

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्ग आदी रस्त्यांवरील जास्तीत जास्त अपघात होणाºया ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

'Geo Tagging', 23,000 'Black Listed Spots' of Accidents in Thane-Palghar District with Malsege Ghat | अपघात रोखण्यासाठी लवकरच ‘जिओ टॅगिंग’, माळशेज घाटासह ठाणे-पालघर जिल्ह्यात अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉटस् ’

अपघात रोखण्यासाठी लवकरच ‘जिओ टॅगिंग’, माळशेज घाटासह ठाणे-पालघर जिल्ह्यात अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉटस् ’

Next

 - सुरेश लोखंडे

ठाणे - जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्ग आदी रस्त्यांवरील जास्तीत जास्त अपघात होणाºया ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील ठिकठिकाणांसह माळशेज घाटातील अपघाती जागा आणि पालघर, जव्हार परिसरातील रस्त्यांवरील अपघाती व अतिधोकादायक सुमारे दोन हजार ३०१ ठिकाणांची नोंद ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट्स’ म्हणून झाली आहे. या ठिकाणांचे आता लवकरच जिओ टॅगिंग होणार आहे. यामुळे संबंधीत रस्त्यावरून धावणाºया वाहनातील स्क्रीनसह मोबाईलवरदेखील ‘अपघात स्थळ’ जवळ आल्याचे वाहनचालकास सूचित होणार आहे.
रस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांवरील ठिकठिकाणचे ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’ म्हणजे अतिधोकादायक अपघात ठिकाणं शोधण्याचे आदेश जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी महापालिकांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आदी यंत्रणाना दिले आहेत. त्यानुसार लोकमतने काही ठिकठिकाणची चाचपणी केली असता सुमारे दोन हजार ३०१ अपघाती व धोकादायक ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’निश्चित केल्याचे निदर्शनात आले.
रस्त्यांवरील या अपघाती व धोकादायक ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स ’ म्हणून घोषीत करण्यासाठी विविध निकष लावण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यावरील कोणताही ५०० मीटरचा असा भाग जिथे गेल्या तीन वर्षांत किमान पाच अपघात झालेल्या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांवरील अपघातांमध्ये किमान दहा व्यक्ती मेलेल्या व गंभीर जखमी असलेल्या ठिकाणांचा ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. या ‘ब्लॅक स्पॉट’ अपघात ठिकाणांचे जिओ टॅगिंग करून दरवर्षी सुमारे १० टक्के अपघातांमध्ये घट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यामध्ये माळशेज घाटातून जाणाºया २२२ क्रमांकाच्या राष्ट्रीय य महामार्गावर ठिकठिकाणी एक हजार २३० ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’ शोधण्यात आले, असे मुख्य कार्यकारी अभियंत्या तृप्ती नाग यांनी सांगितले. नागमोडी वळणाच्या माळशेज घाटात मागील वर्षी ट्रक दरीत पडल्याच्या दुर्दैवी घटनेसह बसचा अपघात होऊन प्रवाशाना जीव गमवावा लागला आहे. टेम्पोवर दरड कोसळून अपघात झाले आहेत. अशा एक ना अनेक अपघात माळशेज घाटात या आधी झाल्याची नोंद आहे. पण आता या घाटातील सर्व अपघाती व धोकादायक ठिकाणांची नोंद घेऊन जिओ टॅगिंगसाठी ते प्रस्तावित केले आहेत. वाहनातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या अपघाती व धोकादायक ठिकाणांची माहिती या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना होणार आहे.
सर्वाजनिक बांधक विभाग १ चे बहुतांशी क्षेत्र महापालिकांच्या कार्यक्षेत्रात येते. या विभागासह बांधकाम विभाग २ च्या १६८ किलोमीटरच्या जिल्हा मुख्य महामार्ग (एमडीआर) कार्यक्षेत्रात कोठेही अपघाती व धोकादायक ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’ नसल्याचे अहवालावरून उघड झाले. या अशा अपघाती रस्त्यांचा शोध घेऊन त्यांची नोंद करण्याची साधी कल्पनादेखील ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला नसल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. यावरून जि.प.च्या बांधकाम विभागाचा दुर्लक्षित व निष्काळजीपणा दिसून येत आहे. शहराना लागून असलेल्या या बांधकाम विभागाना मात्र ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’ आढळून आले नसले तरी पालघर व जव्हार येथील बांधकाम विभागने मात्र ७१ अपघाती ठिकाणे जिओ टॅगिंगसाठी शोधले आहेत.
या अपघातापैकी पालघर विभागाने ८६४ ठिकाणांची कायमस्वरूपी व ५७ ठिकाणांची तात्पुरत्या स्वरूपाची नोंद घेतली आहे. पालघरमध्ये या वर्षासह तीन वर्षात ५४१ अपघातात ५३ जण जिवास मुकले आहेत. तर ४१९ गंभीर आणि उर्वरित ५७ जणां या अपघातांमध्ये किरकोळ जखमी झाल्याची नोंद झाली आहे. याप्रमाणेच १०० ठिकाणचे कायमस्वरूपी अपघात तर ५० तात्पुरत्या स्वरूपांच्या ठिकाणांची नोंद जव्हारने विभागाने घेतली आहे. या ठिकाणच्या अपघातांमध्ये ७२ जणांचा तीन वर्षात मृत्यू झाल्यांची नोंद केली आहे. तर ४३३ जणांना अपघातांमध्ये गंभीर दुखापत झाली असून ९२ व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मुंबई, नाशिक, पुणे, पालघर या भागाशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचप्रमाणे राज्य व जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची निवड करण्यातआली. या अपघाती व धोकादायक याठिकाणी बांधकाम विभागांनी आवश्यक ती दुरु स्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगविणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रु ग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा आॅडिट आदी कामे सातत्याने करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

 

Web Title: 'Geo Tagging', 23,000 'Black Listed Spots' of Accidents in Thane-Palghar District with Malsege Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.