आरटीई कायद्याखाली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणुन महापालिकेचं मार्गदर्शन केंद्र सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:14 PM2018-04-12T22:14:20+5:302018-04-12T22:14:20+5:30
आरटीई कायद्या अंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक दुर्बल व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळां मध्ये प्रवेश मिळावा म्हणुन महापालिकेने मार्गदर्शन केंद्र उभारले आहे.
मीरारोड - आरटीई कायद्या अंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक दुर्बल व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळां मध्ये प्रवेश मिळावा म्हणुन महापालिकेने मार्गदर्शन केंद्र उभारले आहे. आॅनलाईन अर्ज भरण्या पासुन मार्गदर्शन आदी सेवा मिळणार आहे. त्याचे उद्घाटन आज गुरुवारी महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाच्या आरटीई कायद्या नुसार अनुसुचीत जाती जमाती, मागास वर्गीय व आर्थिक दष्ृट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना १ ली ते ८ वी पर्यंत खाजगी शाळां मध्ये मोफत शिक्षण मिळते. मीरा भार्इंदर मध्ये आरटीई कायद्या खाली ९४ शाळा येत असुन २५ टक्के कोटा या प्रमाणे सुमारे २ हजार जागा ह्या राखीव आहेत.
तसे असले तरी आजतागायत महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागाने या कडे दुर्लक्ष चालवले होते. या मुळे आरटीई कायद्यांतर्गत येणारया खाजगी शाळांना मोठा आर्थिक फायदा पोहचवला जात होता. आरटीई कायद्याची प्रभावी अमलबजावणी, लोकां मध्ये जनजागृती व त्यांना आवश्यक मार्गदर्शन आदी दिले जात नव्हते.
नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांनी दोन महिन्या पुर्वीच्या महासभेत हा मुद्दा उपस्थित करत आरटीई एक्टची प्रभावी अंलबजावणी होत नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळत नाही असे सभागृहाच्या निदर्शनास आणले होते. आता महापालिका नगरभवन येथील शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी दोन संगणक व दोन कर्मचारी कार्यालयीन वेळेत नागरीकांना मुलांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रवेश वेळापत्रक आदींचे मार्गदर्शन करतील. शिवाय आॅनलाईन अर्ज व अन्य माहिती देखील ते येथुनच भरुन देतील.
पालिकेनेच आॅनलाईन सेवा व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध केल्याने लाभार्थी विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मागासवर्गिय व गोरगरीब विद्यार्थ्यांना आरटीई एक्टच्या माध्यमातुन चांगल्या दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालिकेचा प्रयत्न असल्याचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर म्हणाले.
उद्घाटना वेळी उपमहापौर चंद्रकांत वैती, सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, माजी सभापती जयेश भोईर, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, दौलत गजरे, नगरसेविका अनिता पाटील, विणा भोईर, अनिता मुखर्जी, रुपाली मोदी, हेतल परमार, प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.