उल्हासनगरातील जीन्स कंपन्यांच्या बाबत तोडगा काढा, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे राज्य सरकारला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 07:50 PM2017-11-29T19:50:12+5:302017-11-29T20:23:45+5:30

उल्हासनगर येथील जीन्स कंपन्यांच्या संदर्भात तातडीने तोडगा काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणिकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे.

Get rid of jeans companies in Ulhasangan, eat Dr. Shrikant Shinde's state government | उल्हासनगरातील जीन्स कंपन्यांच्या बाबत तोडगा काढा, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे राज्य सरकारला साकडे

उल्हासनगरातील जीन्स कंपन्यांच्या बाबत तोडगा काढा, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे राज्य सरकारला साकडे

Next

ठाणे - उल्हासनगर येथील जीन्स कंपन्यांच्या संदर्भात तातडीने तोडगा काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणिकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. तसेच, पालकमंत्री शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी यांचे सचिव आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी यांची बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले.

उल्हासनगर येथील जीन्स कारखान्यांमुळे वालधुनी आणि उल्हास या नद्यांचे होत असलेले प्रदूषण आणि हे कारखाने बंद होण्यामुळे सुमारे अडिल लाख लोकांवर कोसळणारी बेरोजगारीची कुऱ्हाड या दोन्हीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होणार नाही, अशा प्रकारे या प्रश्नातून तोडगा काढण्याची मागणी खा. डॉ. शिंदे आणि आमदार डॉ. किणिकर यांनी केली. खा. डॉ. शिंदे यांच्या विनंतीनुसार उद्योगमंत्री  देसाई आणि पर्यावरण मंत्री कदम यांच्या मंत्रालयातील दालनांत मंगळवारी दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. जीन्स कारखान्यांच्या वॉशिंग युनिट्सनाअॅडिशनल अंबरनाथ एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देणे, या युनिट्समधील सांडपाण्यावर तेथील सीईटीपीमध्ये प्रक्रिया करणे, ज्या ठिकाणी जीन्स कारखाने मोठ्या संख्येने आहेत, तिथे कारखान्यांचे गट करून त्यांच्यासाठी ईटीपी उभारणे आदी पर्यायांची चाचपणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्य शासन याबाबत सकारात्मक असल्याचे  देसाई आणि कदम यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणिकर, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पर्यावरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अल्बनगण, उल्हासनगर जीन्स वॉश वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष परशुराम पाटील, ‘आमा’चे अध्यक्ष उमेश तायडे, औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र केंद्रे,अॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आमा) अध्यक्ष उमेश तायडे, तसेच ‘एमआयडीसी’ आणि‘एमपीसीबी’चे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Get rid of jeans companies in Ulhasangan, eat Dr. Shrikant Shinde's state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.