उल्हासनगरातील रस्त्याची कामे मार्गी लावा, शिंदे गटाने केली आयुक्तांशी मॅरेथॉन चर्चा

By सदानंद नाईक | Published: October 10, 2022 05:26 PM2022-10-10T17:26:02+5:302022-10-10T17:27:06+5:30

महापालिकेने १ हजार पेक्षा जास्त मालमत्ता, भूखंड, खुल्या जागेवर सनद मिळण्यासाठी प्रांत कार्यालयकडे पाठपुरावा सुरू केला.

Get road works in Ulhasnagar underway, Shinde group held talks with commissioner | उल्हासनगरातील रस्त्याची कामे मार्गी लावा, शिंदे गटाने केली आयुक्तांशी मॅरेथॉन चर्चा

उल्हासनगरातील रस्त्याची कामे मार्गी लावा, शिंदे गटाने केली आयुक्तांशी मॅरेथॉन चर्चा

Next

उल्हासनगर - शहरातील रस्त्याच्या कामसह पाणी प्रश्न, एक्सप्रेस फिडर, भूखंडाना सनद व वर्क ऑर्डर दिलेली कामे सुरू करण्याची मागणी शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना केली. दीड तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीला शिंदे गटाचे अरुण अशान, नाना बागुल, कुलवंतसिंग बुटो यांच्यासह उपायुक्त अशोक नाईकवाडे, नगररचनाकार प्रकाश मुळे, शहर अभियंता प्रशांत साळुंखे आदीजन उपस्थित होते. 

उल्हासनगरातील प्रलंबित कामे दिवाळीपूर्वी मार्गी लागण्यासाठी शिंदे गटाचे शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अजीज शेख यांची सोमवारी भेट घेतली. दिड तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत विविध विषयांवर शिष्टमंडळाने चर्चा करून काही अडचण असेलतर आताच सांगा. असे यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आली. गेल्या महिन्यात पाणी समस्या सोडविण्यासाठी एक्सप्रेस फिडरसाठी एमआयडीसीने एनओसी दिली असून फिडरचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली. तसेच एमएमआरडीएने मुख्य सहा रस्ता बांधणीच्या निविदा काढल्या असून रस्ता पुनर्बांधणीला अडसर ठरणारे बांधकामे हटविण्याची मागणी केली. तसेच निविदा निघूनही कामे सुरू न झाल्याने, ते कामे सुरू करण्याची मागणी केली.

महापालिकेने १ हजार पेक्षा जास्त मालमत्ता, भूखंड, खुल्या जागेवर सनद मिळण्यासाठी प्रांत कार्यालयकडे पाठपुरावा सुरू केला. २० पेक्षा जास्त मालमत्ता व भूखंडाला सनद मिळाली. तर काही मालमत्ताची मोजणी झाली असून त्यांनाही सनद (मालकीहक्क)मिळणार आहे. मात्र काही महिन्यांपासून रेंगाळलेल्या कामाला गती देण्याची मागणी आयुक्ताकडे केली. अशी माहिती अरुण अशान यांनी दिली. कॅम्प नं-५ प्रेमनगर टेकडी परिसरात ११ एकरचा बंद पडलेल्या शासकीय निवासस्थानाच्या भूखंडावर चौही बाजूने झोपडपट्टीचे अतिक्रमण होत आहे. बांधकाम विभाग हा भूखंड महापालिकेला हस्तांतरण करण्यास तयार आहे. मात्र महापालिकेने याबाबत पाठपुरावा केल्यास, महापालिकेची एक सुंदर वास्तू याठिकाणी उभी राहणार आहे. असे मतही अशान यांनी व्यक्त केले. यासह शहाड येथील एमआयडीसीची पाणी पुरवठा योजना हस्तांतरण बाबतही पाठपुरावा करण्याचे अशान यांनी आयुक्तांना सुचविले. 

मॅरेथॉन बैठकीत मोठे फलित मिळणार शहरातील बहुतांश समस्या व विकास कामाबाबत शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांच्याकडे चर्चां केली. चर्चेतून शहर विकास कामाचे फलित लवकरच।शहरवासियांना दिसेल. अशी प्रतिक्रिया अरुण अशान यांनी पत्रकारांना दिली.
 

Web Title: Get road works in Ulhasnagar underway, Shinde group held talks with commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.