शिक्षक-शिक्षकेतरांचे विशेष लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:34+5:302021-07-18T04:28:34+5:30
ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य क्रमाने मिळावी यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व आरोग्यमंत्री ...
ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य क्रमाने मिळावी यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांनी शनिवारी पत्रव्यवहर केला आहे.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांनी ई मेलद्वारे या लसीकरणाची मागणी केली आहे. १५ जुलैपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत, तर अन्य ठिकाणी शिक्षकांना बीएलओ व काेरोना संबंधित कामे करावी लागत आहेत. मागील दोन्ही लाटेमध्ये अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जीव गेल्याची बाब त्यांनी उघड केली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षक कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहावेत म्हणून त्यांचे लसीकरण करण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी केली आहे.