घोडबंदर, मुंब्रा, दिव्याचा पाणी प्रश्न सुटणार

By admin | Published: November 11, 2015 02:26 AM2015-11-11T02:26:16+5:302015-11-11T02:26:16+5:30

मुंब्रा आणि दिव्याच्या पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महापालिकेने येथील वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलींग करण्याचा

Ghodbunder, Mumbra, Dwarka water question will be asked | घोडबंदर, मुंब्रा, दिव्याचा पाणी प्रश्न सुटणार

घोडबंदर, मुंब्रा, दिव्याचा पाणी प्रश्न सुटणार

Next

ठाणे/घोडबंदर : मुंब्रा आणि दिव्याच्या पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महापालिकेने येथील वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलींग करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्राची जेएनएनयूआरएम ही योजनाच बंद झाल्याने पालिकेने आपला प्रकल्प बासनात गुंडाळला होता. परंतु, आता त्याला पुन्हा केंद्र सरकारच्याच ‘अमृत’योजनेत मूर्त स्वरुप देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आता या योजनेत काही सुधारणा करुन हा प्रकल्पाचा अमृतमध्ये समावेश करून निधी मंजूर झाल्यास घोडबंदर, मुंब्रा आणि दिव्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा दावा प्रशासनाने ने केला आहे. घोडबंदर आणि मुंब्य्रातील रखडलेली मलनि:सारणची योजनाही मार्गी लागणार आहे.
घोडबंदर, मुंब्रा व दिवा येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यानुसार महापालिकेने येथील पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलींग करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या तिन्ही भागांना येत्या दोन वर्षात दुप्पट पाणी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ghodbunder, Mumbra, Dwarka water question will be asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.