नौपाड्यातील गरजू कुटुंबीयांना महात्मा फुले जन आरोग्य कार्डची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:34 AM2021-05-03T04:34:51+5:302021-05-03T04:34:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात आर्थिक उत्पन्न बेताचे असलेल्या नौपाड्यातील शेकडो कुटुंबांना महाराष्ट्रदिनी महात्मा जोतिबा फुले ...

Gift of Mahatma Phule Jan Arogya Card to needy families in Naupada | नौपाड्यातील गरजू कुटुंबीयांना महात्मा फुले जन आरोग्य कार्डची भेट

नौपाड्यातील गरजू कुटुंबीयांना महात्मा फुले जन आरोग्य कार्डची भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोना आपत्तीच्या काळात आर्थिक उत्पन्न बेताचे असलेल्या नौपाड्यातील शेकडो कुटुंबांना महाराष्ट्रदिनी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य कार्डची अनोखी भेट मिळाली आहे. ‘भाजप’ आणि ‘विश्वास’ या सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू कुटुंबांची नोंदणी करून गंभीर आजारांवर मोफत उपचारांचा मार्ग खुला करण्यात आला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि वृषाली वाघुले यांनी हा उपक्रम राबविला आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९७१ गंभीर आजार आणि १२१ पाठपुरावा सेवांवर खासगी, तसेच ट्रस्टच्या हॉस्पिटलमधून मोफत उपचार केले जातात. या उपचारांची रक्कम सरकारकडून अदा केली जाते. नौपाड्यातील बहुसंख्य गरजू आणि गरीब कुटुंबांना सुकर, तसेच मोफत उपचारासाठी नगरसेवक वाघुले आणि विश्वास सामाजिक संस्थेने नागरिकांना जन आरोग्य योजनेचे लाभ देण्याचे ठरविले होते. त्यानुसार ही नोंदणी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कोरोना नियमावलीचे पालन करीत कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन कार्डचे वाटप केले. या कार्डमुळे शेकडो नागरिकांना मोफत उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामात भारतीय जनता युवा मोर्चाचे नौपाडा मंडल अध्यक्ष प्रशांत कळंबटे यांनीही सहकार्य केले.

यश आनंद सोसायटी परिसरात राजेश ठाकरे, शैलेंद्र देसले, प्रकाश जांभळे, मुन्नरशेठ चाळ तबेला परिसरात मनोज शुक्ला, अतुल मिश्रा, गावदेवी-न्यू प्रभातनगर परिसरात संतोष दाईटकर, मंत्री प्लॉट परिसरात प्रथमेश कदम, रामदास पवार, दादा पाटीलवाडी परिसरात सुनील साठ्ये, बाळकृष्ण शिंपी यांनी कार्डचे वाटप केले.

घरेलू कामगारांची नोंदणी सुरू

घरेलू कामगार अधिनियमान्वये लाभार्थी म्हणून नोंद केलेल्या १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना राज्य सरकारकडून विविध लाभ दिले जातात. अनेक घरेलू कामगारांची नोंदणी नसल्यामुळे ते सरकारी लाभापासून वंचित होते. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे महिलांची नोंद होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर वाघुले यांनी पुढाकार घेऊन घरेलू कामगारांची नोंदणी सुरू केली आहे.

Web Title: Gift of Mahatma Phule Jan Arogya Card to needy families in Naupada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.