उल्हासनगर अभ्यासिकेला २५० पुस्तकांची भेट, महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांचा पुढाकार

By सदानंद नाईक | Published: December 15, 2022 06:37 PM2022-12-15T18:37:24+5:302022-12-15T18:37:24+5:30

या छोटेखाणी झालेल्या कार्यक्रमात अभ्यासिकेतील मुले, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदीजन उपस्थित होते.

Gift of 250 books to Ulhasnagar Abhyasika, initiative of Municipal Deputy Commissioner Subhash Jadhav | उल्हासनगर अभ्यासिकेला २५० पुस्तकांची भेट, महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांचा पुढाकार

उल्हासनगर अभ्यासिकेला २५० पुस्तकांची भेट, महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांचा पुढाकार

Next

उल्हासनगर :उल्हासनगर महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील ग्रंथालयांसाठी स्पर्धात्मक परीक्षा, चालू घडामोडी यांवर आधारित २५० पुस्तके उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी बुधवारी भेट दिली. या छोटेखाणी झालेल्या कार्यक्रमात अभ्यासिकेतील मुले, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदीजन उपस्थित होते.

 उल्हासनगरातील गोरगरीब व गरजू मुले यूपीएससी, एमपीएससी यासह स्पर्धात्मक परीक्षेत चमकण्यासाठी, महापालिकेने कॅम्प नं-३ मध्ये अद्यावत डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बांधली. अभ्यासिकेत हजारो पुस्तके असून शेकडो मुले याठिकाणी अभ्यास करण्यासाठी येतात. याच अभ्यासिकेतून देशमुख नावाचा मुलगा गेल्या वर्षी यूपीएससी परीक्षेत पास झाला असून त्याने शहराचे व अभ्यासिकेचे नाव उज्वल केले. तसेच एमपीएससी व इतर स्पर्धात्मक परीक्षेतही येथे अभ्यास करणारे मुले पास झाली आहेत.

 महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील मुलांना स्पर्धात्मक परीक्षा, अभियांत्रिक, मेडिकल, यूपीएससी, एमपीएससी आदी परिक्षाना उपयोगी पडणारे २५० पुस्तके देणगी स्वरूपात उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे ,वैद्यकीय अधिकारी डॉ पगारे, राज असरोंडकर, समग्र शिक्षण अभियानाच्या संगीता लहाने, योगेश मराठे व सुनिता वत्तुरकर माफी जण उपस्थित होते. तसेच पुस्तक वाटप कार्यक्रमांसाठी २०० विद्यार्थी सहभागी होते. हा एक स्तुत्य उपक्रम उपायक्त डॉ जाधव यांनी घेतला असून अश्याच प्रकारे विविध अभ्यासक्रमाची पुस्तके नागरिकांनी द्यावीत असे आवाहन जमीर लेंगरेकर, सुभाष जाधव, अशोक नाईकवाडे यांनी केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व व अभ्यासासाठी अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. असरोंडकर यांनी श्रवण, वाचन, लेखन व संभाषण या कौशल्यांची माहिती दिली. ही कौशल्ये संदेश वहनाची कौशल्य आहेत. ती आपल्याला बालपणापासून शिकविली जातात. परंतु या विषयी फारच कमी विद्यार्थी जागरूक आहेत. स्पर्धा परीक्षा असो वा व्यावहारिक जीवन यासाठी ही भाषिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सोदाहरण त्यांनी पटवून दिले. कार्यक्रमाचे संयोजन भास्कर शिंदे, सुनीता वत्तुरकर व योगेश मराठे यांनी केले.
 

Web Title: Gift of 250 books to Ulhasnagar Abhyasika, initiative of Municipal Deputy Commissioner Subhash Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.