‘त्या’ गर्डरला लोखंडी फ्रेमचा आधार

By admin | Published: January 14, 2017 06:27 AM2017-01-14T06:27:40+5:302017-01-14T06:27:40+5:30

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला

'That' girder is the base of the iron frame | ‘त्या’ गर्डरला लोखंडी फ्रेमचा आधार

‘त्या’ गर्डरला लोखंडी फ्रेमचा आधार

Next

धीरज परब / मीरा रोड
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस आधार दिला जाणार आहे. त्यासाठी मेरीटाइम बोर्डाला कळवण्यात आले आहे. त्यांची परवानगी मिळताच आयआरबी काम सुरू करणार आहे. या कामासाठी सुमारे दीड महिना लागण्याची शक्यता असली तरी कामादरम्यान सध्या सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूक बंद करावी लागणार नाही. परंतु, दुरुस्तीनंतर १५ टनांपेक्षा जास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदच ठेवावी लागणार असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे.
जुन्या पुलाच्या गर्डरला मोठा तडा गेल्याचे निदर्शनास आल्याने गेल्यावर्षी सप्टेंबरपासून जुन्या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. गर्डरला गेलेला तडा कशा पद्धतीने दुरुस्त करावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयआरबीच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी पाहणी केली. २०१३ मध्ये गर्डरला तडा गेला असता तो भाग पूर्णपणे बदलण्यात आला होता. पण, आता गेलेला तडा ज्या भागात आहे, तेथेगर्डर बदलणे अशक्य होते. प्राधिकरणाने या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. व्ही.के. रैना यांना पाचारण केले. मूळ बांधकामाच्या सुमारे ९८ नकाशांपैकी केवळ १० ते १२ नकाशेच सापडल्याने दुरुस्तीचा मार्ग खुंटला. अखेर, प्राधिकरणाने ब्रिटिश कंपनी रॅमबोलचे पॉल जॅक्सन यांना बोलावले. ३ आॅक्टोबरला जॅक्सन यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल दिला.
रॅमबोल कंपनीने सुचवल्यानुसार अतिउच्च दर्जाच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस) आधार तडा गेलेल्या गर्डरला देण्यात येणार आहे. त्यासाठी खाडीत उतरून काम करावे लागणार आहे. दोन्ही बाजंूच्या पिलरच्या आधारे ही फ्रेम उभारली जाणार आहे. आयआरबीच हे काम करणार आहे. या कामामुळे एका गाळ्याची उंची कमी होणार असल्याने मेरीटाइम बोर्डाची परवानगी लागणार आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच पत्र दिले आहे. बोर्डाची मंजुरी मिळाल्यावर काम सुरू केले जाणार आहे. सध्या किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असे प्राधिकरणाचे व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले.
दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही अवजड वाहनांची वाहतूक बंदच ठेवावी लागणार आहे. वेगमर्यादेचे काटेकोर पालन करत २० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवता येणार नाही.

Web Title: 'That' girder is the base of the iron frame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.