कोपर पुलाचे गर्डर टाकण्याचे काम लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:38 AM2021-03-24T04:38:28+5:302021-03-24T04:38:28+5:30
डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलाचे गर्डर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. मात्र, सकाळी ९.३० वाजता हे ...
डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलाचे गर्डर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. मात्र, सकाळी ९.३० वाजता हे काम सुरू होणे अपेक्षित ते सकाळी ११ वाजता सुरू झाले. त्यामुळे ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे राजाजी पथवरील ट्रॅफिक ब्लॉकही सहा तासांनी वाढवावा लागला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले की, सोमवारच्या टप्प्यातील गर्डरचे काम पूर्ण झाले. काम थोडे उशिराने सुरू झाल्याने, रात्री काम पूर्ण होण्यास उशीर झाला. दुसऱ्या टप्प्यातील गर्डर २ एप्रिलला येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सहा गर्डर येतील, त्या कामाचा एक गर्डर आधीच आलेला आहे. तेव्हाही असाच दिवसभर राजाजी पथवर ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने सूचना जाहीर केली जाईल, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
--------------