ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या गर्डरचे काम तात्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 11:36 PM2020-11-18T23:36:10+5:302020-11-18T23:40:11+5:30
कोपरी रेल्वे पूलाच्या गर्डरचे काम तात्काळ पूर्ण करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात हा पूल वाहतूकीसाठी खुला करावा, असे निर्देश ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई अहमदाबाद पूर्व द्रूतगती राष्ट्रीय महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल हा अरु द असल्याने या ठिकाणी मुंबईकडे ये-जा करताना तसेच नाशिक अहमदाबादला जाणाºयांना मोठया वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोपरी रेल्वे पूलाच्या गर्डरचे काम तात्काळ पूर्ण करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात हा पूल वाहतूकीसाठी खुला करावा, असे निर्देश ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील अधिका-यांना दिले आहेत.
ठाणे मुंबई मार्गावर कोपरी रेल्वे पुलाच्या कामामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर या रेल्वे पूलाच्या कामाची पाहणी खासदार विचारे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के तसेच शासकीय अधिका-यांसोबत बुधवारी केली. यामध्ये मध्य रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता डी. डी. लोलगे, एमएमआरडीएचे अभियंता सुर्वे, महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. १९६५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्कालीन जनगणनेनुसार रेल्वेच्या कोपरी पुलाचे बांधकाम केले होते. त्यानंतर खासदार विचारे यांना हा पूल धोकादायक झाल्याचे समजताच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तत्कालीन मुख्यमंत्र्याची भेट घेऊन या पुलाच्या बांधकामासाठी तसेच तसेच रेल्वे महाव्यवस्थापकांकडे पाठपुरावा केल्याने यासाठी नकाशांची मंजुरीही मिळाली. २४ एप्रिल २०१८ रोजी सुरू झालेल्या कोपरी पुलाचे बांधकाम मे २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे बंद पडलेले काम सुरू करण्यासही त्यांनी मंजुरी मिळवली होती.
बुधवारी झालेल्या या पाहणी दौºयामध्ये विचारे यांनी ६५ मीटर लांबीच्या १४ गर्डर पैकी फेज एकच्या सात गर्डरचे काम डिसेंबर अखेरपर्यंत टाकण्याच्या सूचना रेल्वे अधिकाºयांना दिल्या. त्यावरील कॉंक्रि टीकरणाचे (स्लॅपचे) काम जानेवारीच्या अंतिम आठवड्यात पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करावा. तसेच दुसºया टप्प्यातील फेज एकच्या पुढील गर्डर चे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही विचारे यांनी यावेळी अधिकाºयांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.