ठाणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारीपदी आता गिरीष झळके

By जितेंद्र कालेकर | Published: March 4, 2020 08:42 PM2020-03-04T20:42:23+5:302020-03-04T20:50:32+5:30

ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशीकांत काळे यांचीही पुन्हा मुंबई महापालिकेमध्ये बदली झाली आहे. काळे हे गेल्या चार वर्षांपासून मुंबईतून ठाण्यात प्रतिनियुक्तीवर दाखल झाले होते. त्यांच्या जागी गिरीष झळके यांच्याकडे ठाण्याच्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

 Girish Jhalak is now the Chief Fire Officer of Thane Municipal Corporation | ठाणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारीपदी आता गिरीष झळके

शशीकांत काळे पुन्हा मुंबईत परतले

googlenewsNext
ठळक मुद्देशशीकांत काळे पुन्हा मुंबईत परतलेचार वर्षांपासून होते ठाण्यात प्रतिनियुक्तीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी कार्यमुक्त होत असल्याचे जाहीर करताच अवघ्या काही तासांमध्येच ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशीकांत काळे यांचीही पुन्हा मुंबई महापालिकेमध्ये बदली झाली आहे. काळे हे गेल्या चार वर्षांपासून मुंबईतून ठाण्यात प्रतिनियुक्तीवर दाखल झाले होते. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा गिरीष झळके यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील उपमुख्य अग्निशमन अधिकारी काळे यांची काही अटी शर्थींवर २ जून २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. याच पार्श्वभूमीवर काळे हे ६ जून २०१६ रोजी ठाण्यात मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर रुजू झाले होते. काळे यांची मुंबई महापालिकेनेही मागणी केल्यामुळे त्यांना ३ मार्च २०२० पासून ठाणे महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांची सेवा मुळ विभागाकडे प्रत्यावर्तीत करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर अधिकारी उपलब्ध होईपर्यंत प्रशासकीय कारणास्तव मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार विभागीय अधिकारी झळके यांच्याकडे सोपविण्याचे आदेश ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ३ मार्च रोजी काढले आहेत.

‘‘ शशीकांत काळे यांची मुळची नियुक्ती ही मुंबई महापालिकेचीच होती. मुंबई महापालिकेने त्यांची मागणी केली असल्यामुळे त्यांना आयुक्तांच्या आदेशाने ठाण्यातून कार्यमुक्त केले. त्यांच्या जागी सेवाजेष्ठतेमध्ये वरिष्ठ असलेल्या गिरीष झळके यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.’’
ओमप्रकाश दिवाटे, उपायुक्त, मुख्यालय, ठाणे महापालिका.

 

Web Title:  Girish Jhalak is now the Chief Fire Officer of Thane Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.