मालाडच्या रुग्णालयात जन्मलेली मुलगी तब्बल १६ वर्षांनी मीरारोडच्या बारबालेकडे सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 08:49 PM2017-09-16T20:49:25+5:302017-09-16T20:49:32+5:30

मुंबईच्या मालाड भागातील रुग्णालयात जन्मलेली मुलगी मीरारोडच्या एका बारबाले कडे असल्याचे तब्बल १६ वर्षांनी उघड झाले आहे. सदर मुलगी बारबालेलाच आई समजत होती. सुदैवाने तीला वाममार्गाला लावायच्या आधीच ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीची सुटका केली.

A girl born in Malad Hospital, after 16 years, was found at Barabala in Mirrored | मालाडच्या रुग्णालयात जन्मलेली मुलगी तब्बल १६ वर्षांनी मीरारोडच्या बारबालेकडे सापडली

मालाडच्या रुग्णालयात जन्मलेली मुलगी तब्बल १६ वर्षांनी मीरारोडच्या बारबालेकडे सापडली

Next

मीरारोड, दि. 16 - मुंबईच्या मालाड भागातील रुग्णालयात जन्मलेली मुलगी मीरारोडच्या एका बारबाले कडे असल्याचे तब्बल १६ वर्षांनी उघड झाले आहे. सदर मुलगी बारबालेलाच आई समजत होती. सुदैवाने तीला वाममार्गाला लावायच्या आधीच ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीची सुटका केली. तर मुलीच्या ख-या आई - वडिलांचा शोध आता पोलिस घेत आहेत.

ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी मीरारोड पोलिस ठाण्यात या बाबत पत्रकार परिषद घेतली. या वेळी डॉ. पाटील म्हणाले की अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक निरीक्षक संजय बांगर व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहिती वरुन त्यांनी मीरारोडच्या न्यु म्हाडा वसाहती मधील शिवगर्जना इमारतीत ८ व्या मजल्यावर राहणारया किरण ताराचंद राज (४४ ) वर्ष हिच्या घरी धाड टाकली.

किरण ही बारबाला असुन ती दोन मुलं व खुशी ह्या १६ वर्षाच्या मुलीसह रहात होती. चौकशीत दोन मुलगे तीचे स्वत:चे असल्याचे तर एक मुलगा गावी असल्याचे सांगीतले. परंतु १६ वर्षाची मुलगी मात्र आपली नसल्याचा सांगत तीने धक्कादायक खुलासा केला.

सदर मुलगी ही २००१ साली मालाडच्या मालवणी भागातील अनुराधा रुग्णालयात जन्मली होती. खुशी ही १० ते २० दिवसांची असताना किरणची मयत बहिण सुषमा सिंग व रुग्णालयातील आया यांच्या मध्यस्थीने तीला किरणच्या स्वाधिन केले होते.

किरणने खुशीला लहानाचे मोठे केले. ती ५ वी पर्यंत शांती पार्क जवळील डॉन बोस्को शाळेत शिकली. सद्या ती घरीच होती व घरकाम करायची.

काशिमीरा पोलिस ठाण्यात किरण विरुध्द विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला असुन सद्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी खुशीच्या खरया आई वडिलांच्या शोधार्थ अनुराधा रुग्णालयात चौकशी केली असता तेथुन माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तर मालवणी पोलिस ठाण्यात देखील मुलगी चोरीची नोंद नसल्याचे समोर आले आहे.

अनुराधा रुग्णालयातुन माहिती दिली जात नसल्याने कायदेशीर कारवाईचा अवलंब करणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगीतले. शिवाय सदर मुलीचा जन्म व तीला पळवुन नेल्या बद्दल कोणाला माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

किरण ही बारबाला असुन त्यांच्या एकुणच नातलगां मध्ये मुलींना फार महत्व आहे. मुली मोठ्या झाल्यावर त्यांना मुजरा वा बार मध्ये पाठवले जाते. तसेच अनैतिक व्यवसायात ढकलले जाते. या आधी मीरा रोड मधुन ११ व ३ वर्षांच्या मुलींची सुटका पोलिसांनी केली होती. त्यातील आरोपी व किरण हे एकाच समाजातले तसेच लांबचे नातलग असल्याचे पोलिस सुत्रांनी स्पष्ट केले. तर खुशी हिला सद्या रेसक्यु फाऊंडेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.

१६ वर्षां पुर्वी खुशी हिला किरणने आणले होते. ती त्यावेळी अवघ्या १० ते २० दिवसांची होती. परंतु मालवणी पोलिस ठाण्यात त्या वेळी मुल चोरीला गेल्याची वा हरवल्याची नोंद नाही. दुसरी कडे रुग्णालया कडुन मात्र त्या काळातले बाळंतपण झालेल्या महिलांचे दस्तावेज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या वरुन एकतर खुशीच्या जन्मदात्यांनी मुलगी झाली म्हणुन तीला आया व सुषमाच्या हवाली केले असावे ? किंवा रुग्णाालयाचा देखील मुल चोरीत अथवा या सर्व प्रकरणात हात असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: A girl born in Malad Hospital, after 16 years, was found at Barabala in Mirrored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.