मुलीवर अत्याचार, बापाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:48 AM2018-12-03T00:48:35+5:302018-12-03T00:48:41+5:30
स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापाला शुक्रवारी कल्याण न्यायालयाचे न्या. डी.एस. हातरोटे यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
कल्याण : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापाला शुक्रवारी कल्याण न्यायालयाचे न्या. डी.एस. हातरोटे यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
कल्याण तालुक्यात राहणाऱ्या ४२ वर्षांच्या नराधम बापाने घरात कोणी नसताना मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर, कल्याण आणि सीएसएमटी येथील शौचालयात रेल्वे प्रवाशांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होता.
महिला सहायक पोलीस निरीक्षक जे.डी. हिब्बारे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून राखी पांडे यांनी काम पाहिले. पोलीस हवालदार एस.बी. कुटे आणि महिला पोलीस शिपाई भारती परदेशी यांनी त्यांना मदत केली.