मुली पळून गेल्याचं प्रकरण: उल्हासनगरमधील दोन महिला केअरटेकरची नोकरीच गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:35 IST2025-01-10T19:34:27+5:302025-01-10T19:35:37+5:30
निरीक्षणगृहाच्या १० फूट उंच भिंत व त्यावरील लोखंडी जाळी तोडून अल्पवयीन मुली पळून केल्याचे निष्पन्न झाले.

मुली पळून गेल्याचं प्रकरण: उल्हासनगरमधील दोन महिला केअरटेकरची नोकरीच गेली
-सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलीच्या निरीक्षणगृहातून पळून गेलेल्या ८ मुली प्रकरणाची दखल महिला बाल कल्याण विकास विभागाने घेऊन कार्यरत २ केअरटेकरची हकालपट्टी केली. तसेच विभागाच्या पथकाने निरीक्षणगृहाची पाहणी केल्याची माहिती अधिक्षका हीव्हीएन सिल्व्हर यांनी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर कॅम्प नं-५, शांतीभवन येथील सरकारी मुलीच्या निरीक्षणगृहातून मंगळवारी पहाटे ३ वाजता एकूण ८ मुलींनी १० फूट उंच भिंत व त्यावरील लोखंडी जाळी तोडून पळून गेल्या होत्या. मात्र हिललाईन पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या दोन ते तीन तासात ८ पैकी ७ मुलींना शोधण्यात यश आले. तर एका मुलीचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकाराने मुलीच्या निरीक्षणगृहाच्या कारभारावर टीका झाली असून महिला बाळ कल्याण विभागाच्या पथकाने शुक्रवारी निरीक्षणगृहाची पाहणी केली. तसेच त्यादिवशीं कामावर उपस्थित असलेल्या कंत्राटीतत्वावर काम करणाऱ्या २ केअरटेकर यांची हकालपट्टी केली.
मात्र निरीक्षणगृहात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीसाची हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी पाठराखण केली. याप्रकरणी केलेल्या चौकशीत महिला पोलिसांचा काही दोष नसल्याने, कारवाई केली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी दिली.
निरीक्षणगृहाच्या १० फूट उंच भिंत व त्यावरील लोखंडी जाळी तोडून अल्पवयीन मुली पळून केल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये महिला पोलीस व केअरटेकर यांचा दोष नसल्याचे केलेल्या चौकशीत उघड झाले. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे महिला शिपाई यांच्यावर कारवाई केली नाही. तसेच केअरटेकर महिलांची केलेली हकालपट्टी चुकीची आहे, असे जगताप यांनी सांगितले. निरीक्षण गृहाच्या अधीक्षका सिल्व्हर यांनी विभागाकडून निरीक्षणगृहाची पाहणी होऊन दोन कार्यरत असलेल्या कंत्राटी केअरटेकर महिलांची हकालपट्टी केल्याचे सांगितले.