जिल्ह्यात मुलींची बाजी

By Admin | Published: May 27, 2015 10:53 PM2015-05-27T22:53:01+5:302015-05-27T22:53:01+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे.

Girls' stake in the district | जिल्ह्यात मुलींची बाजी

जिल्ह्यात मुलींची बाजी

googlenewsNext

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. यात रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के लागला असून सर्वच तालुक्यांत मुलींनी बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी निकाल ४७.०५ टक्के लागला आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, मुरुड, माणगांव, श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड या सात तालुक्यांचा निकाल ९० टक्केपेक्षा अधिक तर उरण, कर्जत, सुधागड, पेण, रोहा, तळा व पोलादपूर तालुक्याचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. केवळ खालापूर तालुका काहीसा पिछाडीवर गेला असून या तालुक्याचा निकाल ७६.९२ टक्के लागला आहे.
रायगड जिल्ह्यातील बारावीसाठी १४ हजार ९५३ मुले तर १३ हजार ५३८ मुली असे एकूण २८ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार ९४५ मुले तर १२ हजार ७९९ मुली असे एकूण २५ हजार ७४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ८६.५७ टक्के मुले तर ९४.५४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के आहे. जिल्ह्यात २ हजार ४३८ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १ हजार १४७ उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ४७.०५ टक्के आहे.
विज्ञान शाखा निकालात प्रथम क्रमांकावर असून या शाखेचा निकाल ९४.३१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील एकूण २८ हजार ४९१ परीक्षार्थींमध्ये विज्ञान शाखेचे ९ हजार ५८४ परीक्षार्थी होते. त्यापैकी ४३४ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २ हजार ३५९ प्रथम, ५ हजार ७०१ द्वितीय तर ५४५ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ९ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५० टक्के लागला असून एकूण ९ हजार ६९९ परीक्षार्थींपैकी ६८६ विशेष गुणवत्ता श्रेणीत, ३ हजार २२१ प्रथम, ४ हजार ५८८ व्दितीय तर ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ८ हजार ९७२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उच्च व्यवसाय अभ्यास (व्होकेशनल) शाखा निकालात तृतीय क्रमांकावर असून ८८.९५ टक्के निकाल लागला आहे. या शाखेचे ८६९ परीक्षार्थी होते, पैकी २२ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २४८ प्रथम, ४८७ व्दितीय, १६ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ७७३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचा निकाल ८३.४६ टक्के लागला आहे. या शाखेत एकूण ८ हजार ३३९ परीक्षार्थी होते, पैकी ११९ विशेष गुणवत्ता श्रेणीत, १ हजार ६८४ प्रथम, ४ हजार ३८७ द्वितीय, ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ६ हजार ९६० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)

नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल बुधवारी जाहीर झाला. येथील कोएसोच्या कै. सरेमल प्रतापमल जैन उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ८१.४९ टक्के लागला. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेचे परीक्षेस बसलेले ३६२ पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ७३ टक्के इतका लागला असून ४३ पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेतून शिमना अक्र म अन्सारी (प्रथम), झैबा अनिस अधिकारी (द्वितीय)आणि रफत हमीद चोरडेकर (तृतीय) तर वाणिज्य शाखेतून मोईन महमद चोगले (प्रथम), असद सलीम शिंदी (द्वितीय), माज मिर्झा पठाण (तृतीय) असे क्र मांक मिळविले. येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी.परमार इंग्लिश स्कूलचा निकाल ६४ टक्के लागला असून २८ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत आकांक्षा चौधरी (प्रथम), कौशल पटेल (द्वितीय) आले आहेत.

कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ९३.२४ टक्के
कोकणातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोयायटीचा निकाल ९३.२४ टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी दिली. संस्थेच्या १२ कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ७ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९३.२४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अलिबाग येथील केईएस इंग्रजी मिडीयम कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

 

Web Title: Girls' stake in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.