जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी

By Admin | Published: May 31, 2017 05:47 AM2017-05-31T05:47:51+5:302017-05-31T05:47:51+5:30

यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. यंदाही यात मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या

Girls still have a chance in the district | जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी

जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बाजी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. यंदाही यात मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता ८४.९५ टक्के मुले तर सर्वाधिक म्हणजेच ९२.७८ टक्के मुलींनी यश मिळवले आहे. यात ३४,५४४ विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातर्फे (एचएससी) फेब्रुवारी - मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहिर झाला. जिल्ह्यातून यंदा ८९,९२४ विद्यार्थी परिक्षेस पात्र होते. त्यापैकी ७९,७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ३९,६६१ मुली असून ४०,०७७ मुलांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या एकूण निकालात ८३५९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळविण्यात यश आले असून २६,१८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ३८,९५६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली असून ६२३८ विद्यार्थ्यांना पास क्लासवर समाधान मानावे लागले आहे. रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून येते. रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल यंदा ४५.०९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी रिपिटर्सचा निकाल ३९.५८ टक्के असल्याने यंदा त्यात झालेली वाढ समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
शहरातील १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण
ठाणे महापालिका क्षेत्रातून एकूण १६,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, भिवंडी या भागांतील निकालाची टक्केवारी जिल्ह्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
यंदा कलाशाखेची टक्केवारी घसरली
शाखांनुसार निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९२.८९ टक्के असून वाणिज्य शाखेचा निकाल ८९.५० टक्के आहे. कला शाखेच्या निकालात यंदा घसरण झाली असून ७८.५३ टक्के निकालाची नोंद झाली आहे. व्यावसायाभिमुख शाखेचा निकाल ९१.४९ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्यातून
विज्ञान शाखेत २७,१२८ विद्यार्थ्यांपैकी २५,१९८ विद्यार्थी उत्तीर्ण वाणिज्य शाखेतून ४६,४१९ विद्यार्थी बसले होते पैकी ४१,५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरली आहे.


भिवंडी आघाडीवर

कल्याण-डोंबिवली परिसरातील २०१२६ विद्यार्थ्यांपैकी १७,४४५ (८६.६८ टक्के) इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून भिवंडी परिसरात सर्वाधिक ९०.११ टक्के निकाल लागला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण यांसारख्या ग्रामीण भागांचा निकाल ९० टक्क्यांच्या आसपास आहे.

Web Title: Girls still have a chance in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.