इम्पॅक्ट डे शिबिरात ठाण्यातील मुलींनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:15 AM2021-02-18T05:15:46+5:302021-02-18T05:15:46+5:30
ठाणे : असुरक्षित वातावरणात राहणारी मुले, महिला तसेच युवा वर्गाच्या सबलीकरणाची जबाबदारी उदयन केअर या एनजीओने उचलली आहे. उदयन ...
ठाणे : असुरक्षित वातावरणात राहणारी मुले, महिला तसेच युवा वर्गाच्या सबलीकरणाची जबाबदारी उदयन केअर या एनजीओने उचलली आहे. उदयन केअरसोबत डेलॉइटच्या वतीने ‘वर्ल्ड क्लास’ नावाने एकसमान कार्यक्रम राबविला जाणार आहे. या ग्लोबल प्रोग्रामचा भाग म्हणून डेलॉइटच्या वरिष्ठ व्यावसायिकांसमवेत ‘इम्पॅक्ट डे’ असे कौशल्य-आधारित शिबिर झाले. या शिबिरात अनुभवांचे आदान-प्रदान करण्यात आले. डेलॉइटचे ग्लोबल सीईओ पुनीत रेन्जेन यांच्या समवेत ठाण्यातील पाच मुलींनी संवाद साधला. पुनीत यांचा रोहतकमधील लहानसे शहर ते अमेरिकेतील पोर्टलँडमधील डेलॉइट कॉर्नर ऑफिसपर्यंतचा प्रवास यावेळी त्यांनी सांगितला. मुलींना त्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्दिष्ट गाठण्याकरिता अधिकाधिक साह्य मिळावे या अनुषंगाने हा कृतीसराव घेण्यात आला. सुमारे आठ शहरांतील २५० मुलींनी या सत्रात सहभाग दर्शवला होता. याप्रसंगी ठाणे शहराच्या रहिवासी असलेल्या शक्ती कोनार, सिद्धी कावा, मेघा व निहारिका भारद्वाज यांनी स्वत:ची वैयक्तिक ध्येय तसेच उदयन केअरकडून मिळालेल्या मदतीबद्दल सांगितले.