रिक्षाचालकांना कोविड लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:16 AM2021-03-04T05:16:06+5:302021-03-04T05:16:06+5:30

कल्याण : रिक्षा आणि टॅक्सीचालकांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे तातडीने कोविड लस देण्यात यावी, अशी मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी ...

Give covid vaccine to rickshaw pullers | रिक्षाचालकांना कोविड लस द्या

रिक्षाचालकांना कोविड लस द्या

Next

कल्याण : रिक्षा आणि टॅक्सीचालकांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे तातडीने कोविड लस देण्यात यावी, अशी मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रिक्षा व टॅक्सी सेवा सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख अत्यावश्यक घटक आहे. रिक्षा, टॅक्सीचालक दिवस-रात्र प्रवासी सेवा कारणाने मनपा क्षेत्र व इतर लगतच्या शहरात फिरत असतात. यामुळे कोरोनाबाधित प्रवासी संपर्क व संक्रमण शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेक महिने रिक्षा-टॅक्सी वाहतूक बंद होती. परिणामी, रिक्षा-टॅक्सीचालकांचे उत्पन्न बंद होते. अनलॉकमध्ये लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांचे उत्पन्न घटले आहे. याचा विचार करता ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीम राबवून रिक्षा व टॅक्सी चालकांना सरकारी रुग्णालयांमध्ये प्राधान्याने कोविड लस द्यावी, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी निवेदनात केली आहे.

-----------------------------------------------------

Web Title: Give covid vaccine to rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.