रोपे जाळणाऱ्याची माहिती द्या, अन् ५० हजारांचे बक्षीस मिळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:51 AM2018-11-22T00:51:14+5:302018-11-22T00:51:32+5:30

मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीनंतर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शिवसैनिक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

Give information about the burners of the seedlings, and get 50,000 prizes! | रोपे जाळणाऱ्याची माहिती द्या, अन् ५० हजारांचे बक्षीस मिळवा!

रोपे जाळणाऱ्याची माहिती द्या, अन् ५० हजारांचे बक्षीस मिळवा!

Next

ठाणे : मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीनंतर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शिवसैनिक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रोपवनास आग लावणा-या समाजकंटकांची माहिती देणा-याला वनविभागाने ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाºया व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
सरकारच्या ५० कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व इतर स्वयंसेवी संस्था तसेच लोकसहभागातून दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात रोपलागवड केली आहे. या रोपांचे संरक्षण व संगोपनाची जबाबदारी वनविभाग आणि वृक्षलागवड मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांकडे होती. या रोपवनाला समाजकंटकांनी आग लावून पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर रोपवनास आग लावणाºया संमाजकंटकांविषयी माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवले जाणार असून त्याला ५० हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे ठाणे वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील बहुतेक रोपवनांना उन्हाळ्यामध्ये (डिसेंबर ते मे) पाणी देणे आवश्यक असते. सरकारी यंत्रणेकडे एवढी साधनसामग्री व निधी नसल्यामुळे नागरिक, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्थांनी आपल्या परिसरातील रोपांना पाणी देण्याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने स्वीकारावी, असे आवाहनही वनविभागाने केले आहे.

२४ तास हेल्पलाइन
वृक्षांची जाळपोळ करणाºया समाजकंटकांची माहिती देण्यासाठी वनविभागाने १९२६ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. त्याचबरोबर ०२२-२५४४५४५९, २५४४२११९ या दूरध्वनींसह ८१०४९२६३१३ भ्रमणध्वनींवर माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.

Web Title: Give information about the burners of the seedlings, and get 50,000 prizes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे